शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले श्रीपाल जैन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 23:50 IST

डॉ.जैन यांनी आपल्या क्लिनिकमध्ये कोविड रुग्णांवर उपचारास सुरुवात केली. पाहता-पाहता पद्मानगर पाठोपाठ भिवंडी शहरासह ग्रामीण भागातून त्यांच्या क्लिनिकमध्ये दिवसाला ७० ते ८० पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी येऊ लागले.

नितीन पंडित

भिवंडी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, अनेक डॉक्टरांनी आपला दवाखाना बंद ठेवला होता. मात्र, पद्मानगर येथील डॉ.श्रीपाल जैन हे आपले क्लिनिक सुरू ठेवून शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. पहिल्या लाटेपासून आजतागायत त्यांनी आपले रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांची शुश्रूषा करत आहे.

डॉ.जैन यांनी आपल्या क्लिनिकमध्ये कोविड रुग्णांवर उपचारास सुरुवात केली. पाहता-पाहता पद्मानगर पाठोपाठ भिवंडी शहरासह ग्रामीण भागातून त्यांच्या क्लिनिकमध्ये दिवसाला ७० ते ८० पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी येऊ लागले. सध्या सकाळी ९ ते ३ व सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत क्लिनिकमध्ये भिवंडी शहर व तालुक्यासह मुलुंड, ठाणे, मीरा- भाईंदर, वालीव, वसई, पडघा, वाडा, शहापूर या परिसरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांची गैरसाेय हाेत हाेती.येथे आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण बरे झाल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करतानाच, त्यांच्यामुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले, अशी कबुली वसई येथून उपचारासाठी येणाऱ्या रोहन मोहिते यांनी दिली. या क्लिनिकमध्ये उपचार घेऊन बरे होणारे अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. एका घरातील तीन-तीन जणांना कोरोना बाधा होऊन, वडिलांची ऑक्सिजन पातळी खालावलेली असताना आम्ही सर्व जण सरकारी रुग्णालयात उपचार न घेता, डॉ.जैन यांच्यावरील विश्वासामुळे त्यांच्याकडे उपचार घेऊन बरे झाल्याचे समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया अंबाडी येथील नितेश जाधव यांनी दिली.

दिवस संपतो पहाटे ३ वाजताडॉ.जैन हे अवघे ४२ वर्षांचे आहेत. सकाळी नझराणा कम्पाउंड व नंतर पद्मानगर क्लिनिकमध्ये सकाळ, संध्याकाळ प्रॅक्टिस करतात. आदर्श पार्क येथे भगवान महावीर रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांच्या तपासणीसाठीही वेळ काढून जात असल्याने, सकाळी ९ वाजता सुरू होणारा दिवस रात्री दोन किंवा तीन वाजता संपतो. रुग्णांवर उपचार करीत असताना, आलेल्या रुग्णास घाबरून न जाता उपचार घेऊन बरे होता येते, हा विश्वास देत असल्याने व उपचाराने रुग्ण बरे होत असल्याने समाधान मिळत असल्याची प्रतिक्रिया डॉ.जैन यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या