शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार वीज खंडित होण्यामुळे डोंबिवलीकर त्रस्त- श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 19:17 IST

शिवसैनिक, महावितरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक

डोंबिवली: महाराष्ट्र राज्य विज वितरण महामंडळाच्या अखत्यारीत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथ परीसरात वारंवार  विजपुरवठा    खंडीत होण्याच्या नागरीकांच्या तक्रारी वरचेवर येत असतात याची दखल घेउन खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज महावितरणच्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक आयोजीत केली होती.

सदर बैठकीस ज्येष्ठ नगरसेवक श्री. विश्वनाथ शिंदे, नगरसेवक श्री. राजेश मोरे व नगरसेवक श्री. दिपेश म्हात्रे तर महावितरण कंपनी तर्फे विभागीय संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य कार्यकारी अभियंता श्री. दिनेश अग्रवाल, अधिक्षक  अभियंता श्री. सुनिल काकडे, श्री. पेटकर, श्री. प्रविण परदेशी, कल्याण पूर्वचे कार्यकारी अभियंता श्री. धावड,  अतिरीक्त कार्यकारी अभियंता श्री. कलढोण, व इतर अधिकारी हजर होते.

सदर बैठकी दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या प्रयत्नामुळे एकात्मिक उर्जा विकास योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना इत्यादी योजनेतून  सुमारे १२० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मीळाली आहे त्या कामांची पूर्तता कशी व कधी होणार आहे याची विचारणा मा. खासदार महोदयांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली.

याबाबत बोलताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर कामांसाठी महापालिकेकडून रस्ता खोदून पूर्ववत करण्याच्या पोटी महापालिकेकडून परवानगीसाठी अर्ज केला असून त्याला परवानगी मीळताच सदर कामे चालू करून हि कामे मे-जून पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली.श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मा. महापौर सौ. विनिता राणे व आयुक्त मधुकर बोडके यांना फोन वरून सदर कामास तातडीने मंजुरी द्यावी असे आदेश दिले.

या निधीतून कल्याण पूर्व येथील मेट्रो मॉल येथे व अंबरनाथ पश्चीम येथील  मोहनपूरम जवळ नविन उपकेंद्रे, २७९  नविन ट्रांस्फॉर्मर्स, २२२ जुन्या ट्रांस्फॉर्मर्स ची क्षमता वाढवीणे १५६  किमी लांबीची उच्च दाबाची व लघु  दाबाची लाईन टाकणे, झंपर बदलणे व यासंबंधाने करावयाची कामे करण्यात येणार आहेत. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अत्यल्प होइल अशी ग्वाही श्री. अंकुश नाळे यांनी दिली.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेelectricityवीजdombivaliडोंबिवली