शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात श्रेयस सनगरे तर कनिष्ठ गटात दर्शन गायकवाड प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:29 IST

ठाण्यातील सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात वक्तृत्वाचा महायज्ञ पार पडला.

ठळक मुद्देसतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात वक्तृत्वाचा महायज्ञ वरिष्ठ गटात श्रेयस सनगरे तर कनिष्ठ गटात दर्शन गायकवाड प्रथमस्पर्धेचे यंदाचे १६ वे वर्ष

ठाणे: ठाण्यातील सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित कै. ग. का. फणसे व कै. इंदिराबाई फणसे कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात माटुंग्यातील रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या श्रेयस सनगरे तर कनिष्ठ गटात माटुंग्यातील डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या दर्शन गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला.उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वरिष्ठ गटातून श्रेयस सनगरे तर कनिष्ठ गटातून नेरळ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनिकेत चाळके याने पटकावले. स्पर्धेचे यंदाचे हे १६ वे वर्ष होते. या स्पर्धेत वरिष्ठ गटात ४९ तर कनिष्ठ गटात ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. वरिष्ठ गटासाठी विश्वास कणेकर आणि नरेंद्र बेडेकर तर कनिष्ठ गटासाठी मकरंद जोशी आणि धनश्री करमरकर यांनी परिक्षण केले. वरिष्ठ गटात एकनाथ गोपाळ (जोशी - बेडेकर महाविद्यालय) याने दुसरा, प्रणाली बोरकर (बी. एन. महाविद्यालय, ठाणे) हिने तिसरा तर उद्धव ठाकरे (ल.दे. सोनावणे महाविद्यालय), क्षितिजा पानस्कर (जोशी - बेडेकर महाविद्यालय), दर्शना उपार (स.प्र. ज्ञानसाधना महाविद्यालय), प्रचिती परब (रुपारेल महाविद्यालय), धनंजय आंबेकर (भवन्स महाविद्यालय) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. कनिष्ठ गटात स.प्र. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अंजली अडावकर हिने दुसरा तर इशिता दळवी हिने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच, मैत्रेयी भारती (मो.ह. कनिष्ठ महाविद्यालय), अनिकेत खोत (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय), रोहन धोंडे (एस.आई. ई. एस. महाविद्यालय)स अमन सरगर (व्ही.जे.टी.आय), अनिकेत चाळके (नेरळ विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. यावेळी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वाती नाझर, पर्यवेक्षिका प्रा. प्रज्ञा कानविंदे, स्पर्धा समिती सचिव प्रा. प्रदिप ढवळ, समीर फणसे आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नियोजनात वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धा प्रमुख डॉ. प्रज्ञा पवार व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धा प्रमुख डॉ. वंदना शिंदे तसेच, प्रा. साधना गोरे, प्रा. मनिषा राजपूत, प्रा. हरेश्वर भोये, प्रा. रुपेश महाडीक, प्रा. महेश कुलसंगे, प्रा. दिलीप वसावे, प्रा. किशोर वानखेडे आदी सहभागी होते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई