शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरे तोडल्याच्या निषेधार्थ श्रमजीवीचा मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:34 IST

हरितपट्ट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार, भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे.

ठाणे : हरितपट्ट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार, भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. हा अन्याय असल्याचा आरोप करून त्याविरोधात शेकडो आदिवासींनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच थांबवण्याची मागणी केली.जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड व ठाणे भागातील आदिवासींची घरे तोडली जात आहेत. त्याविरोधात शेकडो आदिवासींनी एकत्र येऊन हा भव्य मोर्चा काढून प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर श्रमजीवीच्या या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उन्हात असलेल्या व्यासपीठावर पंडित यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, माजी आमदार रूपेश म्हात्रे, टीडीसीसीचे माजी अध्यक्ष आर.सी. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. या बिºहाड मोर्चात सर्वाधिक संख्येने आदिवासी महिलांचा समावेश आढळून आला. कोंबड्या, बकऱ्या, भांडी आदी घेऊन हा बि-हाड मोर्चा श्रमजीवीने काढला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.भारताच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण होत आहे. असे असताना आज गरिबांची मुलं भुकेने मरत आहेत, यापेक्षा दुर्दैवी काय आहे, असा सवाल पंडित यांनी विचारला. भुकेने मृत्युमुखी पडणाºया जगातल्या १०० बालकांमध्ये ५० बालके भारतात आहेत, हे आपल्या जगभर फिरणा-या पंतप्रधानांना सांगितले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कातकरी समाज आजही वेदनामय जीवन जगत आहे. कातकरी उत्थान सुरू केले, मात्र सर्व काही फक्त कागदावर आहे. २०२० पर्यंत सर्वांना घर देणारे आता लोकांची घरे झोपड्या तोडत आहेत.ही तर लोकशाहीची थट्टा मांडल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रूपेश म्हात्रे यांनीही मार्गदर्शन करून या अन्यायाविरोधात २७ नोव्हेंबरला भिवंडीतील सर्व गोडाउन बंद करण्याची घोषणा केली. या मोर्चात कार्याध्यक्ष केशव नानकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, रामराव लोंढे, गणपत हिलीम, हिरामण गुळवी, राजेश चन्ने, दशरथ भालके, प्रमोद पवार, जया पारधी, संगीता भोमटे, जयेंद्र गावित, गणेश उंबरसडा, उल्हास भानुशाली आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.२०१५ पर्यंतची बांधकामे नियमानुकूल कराभिवंडी तालुक्यात प्रथम झालेल्या या कारवाईत आदिवासींचे घरे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली. मात्र, भिवंडीतील गोडाउनही तोडण्याचे आदेश असताना त्यावर मात्र कारवाई न करता प्रथम आदिवासींची जुनी व परंपरागत असलेली घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाने केली.या अन्यायाविरोधात मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच बंद करण्याची मागणी या आदिवासी मोर्चेकऱ्यांनी केली. त्यांच्या या मोर्चाद्वारे आता गोडाउन तोडण्याची कारवाईदेखील थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या मूळच्या आदिवासी, गरीब सामान्य असलेल्या एकाही गरिबाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे पंडित यांनी यावेळी मोर्चेकºयांना मार्गदर्शन करतेवेळी स्पष्ट केले. २०१५ पर्यंतच्या बांधकामांना नियमानुकूल करण्याची मागणी यावेळी त्यांनी लावून धरली.

टॅग्स :thaneठाणे