शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
5
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
6
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
7
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
8
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
9
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
10
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
11
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
12
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
13
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
14
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
15
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
16
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
17
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
18
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
19
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
20
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत

आयुक्तांचे स्वच्छतेचे उपक्रम दिखाऊ, नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:40 AM

स्वच्छता अभियानाची नगरसेवकांनी महासभेत पोलखोल करून उपक्रम दिखाऊ असल्याचा आरोप केला. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत असून केंद्राच्या स्वच्छता पथकाने कौतुक केल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

उल्हासनगर : स्वच्छता अभियानाची नगरसेवकांनी महासभेत पोलखोल करून उपक्रम दिखाऊ असल्याचा आरोप केला. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत असून केंद्राच्या स्वच्छता पथकाने कौतुक केल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.उल्हासनगर महापालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. उपायुक्त संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी, स्वच्छता निरीक्षकासह मुकादम, कर्मचारी आदींनी स्वच्छता मोहिमेंतर्गत भाग घेतला.बुधवारी दुपारी विकास आराखड्याची महासभा संपल्यानंतर शहर स्वच्छ व सुंदर झाल्याची माहिती थेट प्रक्षेपणाद्वारे आयुक्तांनी महासभा सभागृहात नगरसेवकांना दिली. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी शहरातील प्रत्येक चौकात व विविध ठिकाणी कचºयाचे निळे व हिरवे डबे लोखंडी खांबाला लावले आहेत. तसेच वर्गीकरणाबाबत पालिकेने जनजागृती सुरू केली आहे.मागील आठवड्यात स्वच्छता अभियानातील महापालिकेची प्रगती व सर्वेक्षण करण्यासाठी केंद्राचे पथक आले होते. त्यांनी दोन दिवस शहराचे सर्वेक्षण केल्यावर पालिकेच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले, रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव, भारिपच्या गटनेत्या कविता बागुल आदींनी पालिकेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोलकेली.महापालिका मुख्यालयातील स्वच्छतागृहांना सेफ्टी टँक नसून सफाई कामगार हाताने मैला उचलतात. शहरातील इतर स्वच्छतागृहांची हीच परिस्थिती असल्याची टीका शिवसेनेच्या चौधरी यांनी केली. एकूणच पालिकेत सुरळीत व्यवहार होत नसल्याचेच दिसून येत आहे.नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढाशहराला पाणीपुरवठा करणाºया जलकुंभाला गळती लागली असून त्याच्या दुरुस्तीसाठी सहा महिन्यांपासून पाठपुरावा केला.मात्र, आजपर्यंत जलकुंभाची दुरुस्ती केली नसून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याची टीका नगरसेवक भगवान भालेराव यांनी केली.भाजपाच्या अर्चना करनकाळे, साई पक्षाच्या सविता तोरणे-रगडे यांच्यासह शिवसेना, भारिप, पीआरपी, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखवला.शहराची वाटचाल स्वच्छतेकडेमहापालिकेने स्वच्छता अभियानाखाली विविध उपक्रम शहरात राबवले असून ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण हाती घेतले आहे.तसेच अनेक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून तीन हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे नागरिकांना बांधून दिली.तसेच स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबवत आहे. कधी नव्हे शून्य कचरा संकल्पना खºया अर्थाने अस्तित्वात येत आहे.तसेच देशातील स्वच्छता अभियानात ५० शहरांमध्ये उल्हासनगरचा समावेश असेल, असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर