शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगला जागा दाखवा!

By admin | Updated: December 11, 2015 01:13 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन यांनी रेल्वे स्थानकाजवळील परिसर मोकळा करण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात पार्किंगची विकास योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन यांनी रेल्वे स्थानकाजवळील परिसर मोकळा करण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात पार्किंगची विकास योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र स्टेशन परिसरात महापालिकेला पार्किंगची विकास योजना राबविण्यासाठी जागा कुठे आहे हा प्रश्नच आहे. पार्किंगसाठी स्टेशन परिसरात वाहन तळांची सुविधाच अपुरी असल्याने स्टेशन परिसर मोकळे होणार की, केवळ आयुक्तांची वल्गना ठरणार असे बोलले जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यासाठी विविध पर्याय व कशा प्रकारे शहर स्मार्ट केले जाईल याकरीता आयुक्तांनी अहवाल तयार करायचे काम हाती घेतले आहे. अहवाल तयार करीत असताना नागरिकांना कशा प्रकारे शहर स्मार्ट हवे आहे यासाठी त्यांनी चर्चा केली आहे. समाजातील विविध प्रमुख गटांशी चर्चा करुन पर्याय विचारात घेतले गेले आहे. त्यातून शहरातील इतर प्रमुख समस्यापैकी वाहतूक कोंडी मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी जोपर्यंत दूर होत नाही. तोपर्यंत शहर स्मार्ट होत नाही. या मुद्दा लक्षात घेऊन आयुक्त रविंद्रन यांनी स्टेशन परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहिम हाती घेतली. कल्याणमध्ये अतिक्रमणे सफाई करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर डोंबिवली स्टेशन परिसरातील पाहणी आयुक्तांनी केली. डोंबिवली स्टेशन स्टेशन परिसरात पार्किंगची विकास योजना राबविण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले.डोंबिवली स्टेशन परिसरात पूर्व भागात इंदिरा गांधी चौक, बाजू प्रभू चौक, राननगर, केळकर रोड, अनुकूल हॉटेल शेजारी, शुभमंगल कार्यालय शेजारी सगळ््याच ठिकाणी प्रमुख चौक रिक्षा स्टॅण्डने व्याप्त आहेत. पश्चिम भागात गुप्ते रोड, फुले रोड, द्वारका हॉटेल या सगळ््याच ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड आहेत. त्या बाजूला आधीच रस्ता अरुंद आहे. त्यात असलेला रस्ता रिक्षा स्टॅण्डने व्याप्त आहे. कल्याण पश्चिम भागात स्टेशन परिसरात मुख्य स्टॅण्ड, स्कॉय वॉक खाली दिपक हॉटेल, बस डेपो समोर, साधना हॉटेल समोर, शिवाजी चौक, महंमद अली चौक या प्रमुख ठिकाणी रिक्षा स्टॅण्डने जागा व्याप्त केली आहे. रिक्षा स्टॅण्ड शिवाय कल्याण व डोंबिवलीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी बेकायदेशीररित्या पार्किंग केल्या जातात. त्यामुळे स्टेशन परिसर मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कल्याण स्टेशन परिसरात स्टॅटिस सारखा प्रकल्प राबवून देखील स्टेशन परिसरातील कोंडी फुटलेली नाही. > सहाय्यक पोलिस आयुक्त एस.के. डुबल यांनी सांगितले की, स्टेशन परिसरात पार्किंगची सुविधा अपुरी आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही बाब वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने महापालिकेस वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. विद्यमान आयुक्तांनी स्टेशन परिसर मोकळा करण्याची चांगली मोहीम हाती घेतली आहे. तसेच त्यांनी पार्किंगची योजना राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. सुविधा नसली तरी जी काही उपलब्ध सुविधा आहे. त्याठिकाणी वाहन चालक गाडया पार्क करीत नाहीत. पार्किंगची सवय नागरीकांना नाही ही देखील तितकीच महत्वाची बाब आहे.