शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:10 IST

पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.

डोंबिवली  - पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. रविवारी परिसरातील महिला, पुरुष यांनी एकत्र येत प्रकल्पाच्या ठिकाणी त्याविरोधात घोषणाबाजी व निदर्शने केली. उद्यानासाठी भूखंड आरक्षित होता, मग ती जागा बायोगॅससाठी कशी दिली, असा सवाल करत तो अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.गणेशनगरपुढील राजूनगर येथे बायोगॅस प्रकल्प उभारला जात आहे. त्यात कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील पांडुरंग टॉवर, राजवैभव कॉम्प्लेक्स, अमर आॅर्चिड, द्वारका सोसायटी, ओम गणपती सोसायटी, हापसीबाबा सोसायटी, आनंद प्रभा सोसायटी, साईपद्म सोसायटी, श्रीसाई दीप सोसायटी, राजवैभव एनएक्स आदी सोसायट्यांतील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.महापालिकेने रहिवाशांच्या विरोधाकडे गांभीर्याने बघावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी बायोगॅस प्रकल्पविरोधी कृती समितीचे सदस्य विनोद सोनावणे यांनी दिला. ते म्हणाले की, स्थानिक नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे या नागरिकांसोबत आहेत. त्या अनेक इमारतींच्या मधोमध हा प्रकल्प आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच कचऱ्याची दुर्गंधी पसरून डास, उंदीर, घुशी, झुरळ, मुंग्या यांचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळेही नागरिकांना विशेषत: लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो. याच ठिकाणाहून काही अंतरावर महापालिकेचे दोन जलकुंभ आहेत. त्यालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली. बायोगॅसमुळे निर्माण होणाºया गॅसच्या साठ्याचा कधी स्फोट झाला, तर नागरिकांच्या जीवाचे काय? महापालिका या बाबी गांभीर्याने का घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.दरम्यान, निदर्शनाच्या वेळी व्यंकटेश गायकवाड, जितू देशमुख, आत्माराम मोरे, सुहास देशमुख, भूषण पांडे, मनीष शिंदे, सचिन गायकवाड, प्रफुल्ल गिरी आदी उपस्थित होते.प्रकल्प खाडीकिनारी हलवणे योग्यमहापालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, हा प्रकल्प राजूनगरमध्ये होऊ नये. तेथे उद्यान व्हावे. बायोगॅसचा प्रकल्प खाडीकिनारी अन्यत्र स्थलांतरित करता येऊ शकतो.त्यामुळे त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा. आम्ही मात्र नागरिकांसमवेतच आहोत, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले.बायोगॅस प्रकल्पापासून नागरिकांना कोणताही अपाय नाही. बीएआरसीच्या निसर्ग रूमअंतर्गत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पश्चिमेत दररोज ८० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी या प्रकल्पात केवळ १० मेट्रिक टन कचºयापासून बायोगॅस बनवला जाणार आहे. आयरे गावातील प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तो नागरिकांनी आवर्जून बघावा.- घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता,घनकचरा निर्मूलन विभाग, केडीएमसी 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे