शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आपलं पर्यावरण चित्रपट महोत्सवात ६० दर्जेदार लघूचित्रपट पाहण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:30 IST

पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले.

ठाणे: सर्व पर्यावरणप्रेमींच्यादृष्टीने आवडीच्या आणि माहितीपूर्ण अशा आपलं पर्यावरण” या चित्रपट महोत्सवास आजपासून येथील टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन  आज जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात ५ जून पर्यंत ६० विविध पर्यावरणविषयक लघु चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

 पर्यावरण दक्षता मंडळ, वन विभाग, ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून आज पर्यावरण दक्षता मंडळासारख्या सामाजिक संस्था या पर्यावरणासाठी इतके भरीव योगदान देत असल्याबद्धल जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी गौरावोद्गार काढले. जिल्ह्यात कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी काटेकोर पाऊले उचलण्यात येत असून गेल्या दोन तीन वर्षांत जिल्ह्यात २३ लाख झाडे लावण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी बोलतांना पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रा. विद्याधर वालावलकर यांनी पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले. जैवविविधता, पर्यावरण संरक्षण यासाठी या चित्रपटांचा मोठा हातभार लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जून महिन्याच्या “आपलं पर्यावरण” या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी नाबार्डचे निवृत्त मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक मेथील, सुजय पत्की, डॉ संजय जोशी यांचीही उपस्थिती होती.

५ जूनपर्यंत अनेक कार्यक्रमही ठेवण्यात आले आहेत. ३ जून रोजी मानपाडा निसर्ग परिचय केंद्रास भेट, ४ जून रोजी कचराळी व सिद्धेश्वर तलावास भेट, ५ जून रोजी मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष एड शिरीष देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.  तसेच तीनही दिवस दुपारच्या सत्रांमध्ये टाऊन हॉल येथे लघु चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणे