शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमधील दुकाने, व्यवसाय रोज खुले ठेवण्यास परवानगी द्या; दोन्ही आमदारांची आयुक्तांकडे मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 15:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये महापालिकेने सम - विषम पद्धत  आता बंद करून दुकाने - व्यवसाय ...

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये महापालिकेने सम - विषम पद्धत  आता बंद करून दुकाने - व्यवसाय नियमित सुरु करण्यास परवानगी द्या अशी मागणी प्रताप सरनाईक व गीता जैन या शहराच्या दोन्ही आमदारांनी महापालिका आयुक्तां कडे केली आहे . लोकांची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे . त्याच बरोबर नागरिक व व्यापाऱ्यांनी देखील जबाबदारीने मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आमदारांनी केले आहे . 

 

मीरा भाईंदर मध्ये 11 जुलै पासून दुकानांना सम विषम पद्धतीने खुली ठेवण्यास परवानगी आहे . कोरोनाच्या संसर्गाचा मुळे मार्च अखेरीस पासून भाजीपाला , दूध , किराणा, औषधे आदी अत्यावश्यक सेवा वगळून शहरातील व्यवसाय , दुकाने , बाजार आदी सर्व तीन महिन्यां पेक्षा जास्त काळ बंद आहे . शहरातील स्टील उद्योग तसेच अनेक लहान मोठे कारखाने बंद होते . 

 

यामुळे सगळ्यांचेच मोठे आर्थिक नुकसान झालेले असून लहान - सहान नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे . कोरोनाची लागण सुरु होऊन चार महिने उलटले असून आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या रोज शंभरच्या आसपास जात आहे . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे . पालिकेने घरोघरी सर्वेक्षण चालवले आहे . शिवाय झटपट अशी अँटीजेन चाचणी सुरु केली गेली आहे. 

 

कोरोनाचा संसर्ग पसरू नये व त्याची लागण होऊ नये यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेतानाच शहरातील नागरिकांची आर्थिक घडी पुन्हा बसवण्याची नितांत आवश्यकता आहे . नागरिकांच्या हाताला काम नाही मिळाल्यास अनेकांवर उपासमारीची पाळी येईल आणि यातून भयंकर असे सामाजिक प्रश्न उभे राहतील  अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मांडली आहे . 

 

आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी सर्व बाबींचा सारासार विचार करून मीरा भाईंदर मधील सर्व व्यवहार पूर्व पदावर आणण्यासाठी सुधारित आदेश काढून सम विषम पद्धत बंद करावी . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मिशन बिगिन अगेन धोरणाचे पालन केले जावे . गर्दी व संसर्गाची धास्ती आहे आणि शासनाने देखील निर्बंध कायम ठेवले आहेत अश्या आस्थापना वगळून शहरातील सर्व दुकाने - व्यवसाय नियमितपणे सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली आहे . 

 

शासन, महापालिका कोरोना संसर्ग रोखण्यासह रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत . बहुतांश नागरिक देखील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे , गर्दी न करणे , सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी जबाबदाऱ्या घेत आहेत . पण जे बेजबाबदार लोक निर्देश पळत नाहीत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई देखील करणे आवश्यक आहे असे आ . सरनाईक म्हणाले .