शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दुकाने, पेट्रोलपंप, मॉल यांनी पाळला उत्स्फूर्तपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:37 IST

महागाईच्या विरोधात सोमवारी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ठाणे : महागाईच्या विरोधात सोमवारी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुकाने, पेट्रोलपंप, मॉल बंद होते. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक एक तास रोखून धरली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी व मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभर सुरळीत सुरू होती. काँग्रेस आणि मनसे नेते व कार्यकर्त्यांनी पायी चालून भाजपाचा निषेध केला, तर राष्टÑवादीने बैलगाडी, हातगाडी घेऊन पूर्व द्रुतगती मार्गावर उतरून आंदोलन केले.काँग्रेस, मनसे आणि राष्टÑवादीने एकत्र येऊन रॅली काढली. काँग्रेस आणि मनसेचे पदाधिकारी पायी, तर आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आदींसह पदाधिकारी बैलगाडी आणि घोडागाडी घेऊन आंदोलनात सहभागी झाले. पाचपाखाडी ते तीनहातनाक्यापर्यंतच्या या रॅलीमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक मंदावली होती. नितीन कंपनी व तीनहातनाका येथे या आंदोलकांनी ठिय्या मारून आंदोलन केले.>४५४ जणांवर कारवाईशहरातून बेकायदेशीरपणे रॅली काढल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, मनोज शिंदे आणि अविनाश जाधव यांच्यासह ५३ जणांना नौपाडा पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका केली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात बंदपूर्वी आणि त्या काळात ४५४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.वाढत्या महागाईविरोधात हे आंदोलन होते. पेट्रोल डिझेल, गॅसचे दर वाढले असून त्याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे. त्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये आम्ही सहभागी झालो.- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्टÑवादी

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदthaneठाणे