शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात गळयावर वार करुन महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 21:19 IST

ठाण्याच्या राबोडीतील एका महिलेच्या गळयावर चाकूने वार करुन तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली आहे. हा खून कोणी आणि का केला? याचा तपास राबोडी पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देखूनानंतर मृतदेह रस्त्यावरील ट्रकच्या बाजूला फेकलाराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राबोडीतील साकेतकडून कळवा उड्डाण पूलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रेशमा खातून अन्सारी (४२, रा. राबोडी, ठाणे) या महिलेचा मृतदेह गळयावर चाकूने वार केलेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.रेशमा आणि खातून हे पती पत्नी १५ आणि १६ वर्षीय दोन मुलांसह दुसरी राबोडी भागातील तयाब्बा मस्जिदजवळ वास्तव्याला आहेत. २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रेशमा काही कामानिमित्त घराबाहेर पडली. तर तिचा पती मुंब्रा येथील त्याच्या बेकरीमध्ये कामावर गेला होता. सायंकाळी घराबाहेर पडल्यानंतर ती घरी परतलीच नव्हती. रात्री तिचा पती घरी परतला, त्यावेळीही ती न आल्यामुळे तिचा त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी तो राबोडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार देणार होता. दरम्यान, त्याचवेळी २९ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आकाशगंगा, शिवाजीनगर भागात साकेतकडून कळवा पूलाकडे जाणा-या मार्गावरील एका ट्रकच्या बाजूला असलेल्या पदपथाजवळ तिचा मृतदेह काही नागरिकांना आढळला. बाळकूम रोडवरील पोलीस कवायत मैदानाजवळील जयकुमार कंपनीच्या गोदामासमोरील ट्रकपार्र्किंगच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर हा मृतदेह फेकलेला होता. चॉपर किंवा धारधार हत्याराने गळयावर वार करुन तिचा खून केलेला होता. ही माहिती मिळताच नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि राबोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तिची हत्या २८ मे रोजी सायंकाळी ७ ते २९ मे रोजी सकाळी ९ या दरम्यान झाल्याची शक्यता आहे. मात्र, हा खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला, याचा तपास अद्याप सुरु असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारी