लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : येथील नौपाडा परिसरात राहणाºया एका १६ वर्षीय मुलीच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ क्लीप पाठवून तिचा विनयभंग करणा-या संजय पडवळ (३६, रा. रोहिदासनगर, मुलूंड) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. त्याला मुलूंड पोलिसांनीही अशाच एका गुन्हयामध्ये अटक केली आहे.नौपाडा भागात राहणा-या या पिडित मुलीला संजयने त्याच्या मोबाईलवरुन २१ जानेवारी रोजी एक अश्लील व्हिडिओ क्लीप पाठविली होती. पाठविणारी व्यक्ती ओळखीची नसतांना अशा प्रकारे अश्लील व्हिडिओ पाठविल्याने या मुलीने हा प्रकार तिच्या कुटूंबियांना सांगितला. समोरील व्यक्ती कोण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, कोणतीच माहिती समोर आली नाही. अखेर याप्रकरणी या मुलीने २४ जानेवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र चव्हाण यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, यामध्ये संजयचे नाव समोर आले. त्याला मुलूंड पोलिसांनी अशाच गुन्हयामध्ये अलिकडेच अटक केली आहे. त्याने अशाच प्रकारचा व्हिडिओ मुलूंडमधील अन्य एका महिलेलाही पाठविला होता. मुलूंड पोलिसांनी त्याला याप्रकरणात अटक केली आहे. मुलूंड पोलिसांची कोठडी संपल्यानंतर मुंबई न्यायालयामार्फतीने त्याचा ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
धक्कादायक! ठाण्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग: मुलूंडच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 20:35 IST
ठाण्यातील एका अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या मुलूंडमधील संजय पडवळ या तरुणाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या त्याला अशाच एका गुन्हयात मुलूंड पोलिसांनीही अटक केली आहे.
धक्कादायक! ठाण्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग: मुलूंडच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार मुलूंडमधील एका महिलेलाही पाठविली अश्लील क्लीप मुलूंडपाठोपाठ ठाणे पोलीसही करणार कारवाई