शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक प्रकार; थर्टीफर्स्टला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन, पोलिसांनी नोंदवला नाही गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 19:14 IST

थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांमध्ये मध्यरात्री बारा नंतर देखील ध्वनिक्षेपक सुरु असताना ध्वनिप्रदूषण कायद्याच्या उल्लंघनाची एकही नोंद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नाही

मीरा रोड - थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांमध्ये मध्यरात्री बारा नंतर देखील ध्वनिक्षेपक सुरु असताना ध्वनिप्रदूषण कायद्याच्या उल्लंघनाची एकही नोंद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नाही.  विशेषत: काशिमीरा व उत्तन परिसरात व्यावसायीक पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात असताना पोलीसच आधी ध्वनीक्षेपक बंद करायला लाऊन नंतर ध्वनीमापक यंत्राने मोजणीचे नाटक करुन ध्वनीप्रदुषणच झाले नसल्याच्या नोंदी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. त्या बाबतचा व्हिडियोच हाती लागल्याने पोलीस व पार्टी चालकांचे लागेबांधे उघड झाले आहेत.थर्टी फस्टच्या रात्री साठी ध्वनीक्षेपक अर्थात डिजे वा साऊंड वापरण्यासाठी रात्री १२ वाजे पर्यंत परवानगी देण्यात आली होती.मीरा भाईंदर मध्ये थर्टी फस्ट च्या रात्री साठी उत्तन, चौक, काशिमीरा, चेणे, वरसावे, काजुपाडा आदि भागात अशा आलिशान पाटर्यांची रेलचेल होती. रिसॉर्ट, बार व हॉटेल तसेच अन्य आयोजकांनी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले होते. अगदी हजार - दोन हजार पासुन ७ ते ८ हजार प्रती व्यक्तीसाठी प्रवेश शुल्क आकारण्यात आले. लेझर लाईट सह डिस्को लाईट तसेच डॉल्बी साऊंड सह डिजे आदी जय्यत आयोजन करण्यात आले होते.परंतु शहरा सह उत्तन वा काशिमीरा भागात एकही ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन केल्याची घटनाच घडली नसल्याचे पोलीस ठाण्यां मधुन सांगण्यात आले. तर सर्रास मध्यरात्री १२ नंतर देखील उशीरा पर्यंत पार्ट्यां मध्ये डिजे आदीचा दणदणाट सुरु होता असा तक्रारींचा सुर देखील लावला जातोय.सर्रास कायद्याचं उल्लंघन करुन वेळेची व आवाजाची मर्यादा सर्रास ओलांडताना पोलीसांना त्यातही गस्ती वरचे पोलीसांना हाताशी ठेवले जाते. तक्रार आली तरी तक्रारदाराची बोळवण करायची किंवा थोड्यावेळ बंद करुन वरिष्ठांना ध्वनीक्षेपक बंद असल्याचे सांगुन कटवले जाते.दरम्यान उत्तनच्या वेलंकनी तिर्थ मंदिरा मागे समुद्र किनारी सीरआरझेड बाधीत चक्क सरकारी जमीनींवर थर्टी फस्टच्या पार्ट्या सर्रास रंगल्या होत्या. परीसरात देखील दणदणाट सुरु होता.या ठिकाणी उत्तन पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील तैनात करण्यात आले असताना सर्रास पार्ट्यां मध्ये डिजे व ध्वनीक्षेपकांचा वापर चालला होता.तक्रारी नंतर ध्वनी मापक यंत्र घेऊन एका पार्टंच्या ठिकाणा जवळ पोलीस पथक आले खरे पण ते आत न जाता बाहेर लांबच थांबले. पोलीस येताच आयोजकाच्या कर्मचारयाने लगेच ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करा असा निरोप दुसरया कर्मचारयास दिला.त्या नंतर त्या कर्मचारयाने पोलीस पथका जवळ जाऊन पोलीसाशी हात मिळवला. पोलीसाने कर्मचारयास आॅनलाईन असुन लोकेशन येते अशी माहिती दिली. तर दुसरया पोलीसाने ध्वनी प्रदुषणची एक केस करायची म्हणजे नाकीनऊ येते असे सांगत ध्वनीमापक यंत्र चालु केले आहे साऊंड बंद करायला सांगा असे कर्मचारयास सांगीतले. त्या नंतर ध्वनीमापक यंत्राने आवाजाची पातळी मोजण्याचे नाटक करुन पोलीस निघुन गेले.ही सर्व घटनेची रॅकॉर्डिंग झाल्याने पोलीसांचा हा फंडा समोर आलाय. या वरुन ध्वनी प्रदुषण कायद्याच्या अमलबजावणी ऐवजी थर्टीफस्टच्या आयोजकांवर अर्थपुर्ण मेहरेनजर दाखवण्यात आल्याने एकही नोंद शहरात झाली नसल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे.