शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात बाळ विक्रीचा धक्कादायक प्रकार, २२ दिवसाच्या मुलाची ७ लाखाला विक्री

By सदानंद नाईक | Updated: May 18, 2023 18:40 IST

ठाणे क्राईम विभागाची कारवाई, ५ जणांना अटक

उल्हासनगर : शहरात कॅम्प नं-३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होम मध्ये अवघ्या २२ दिवसाच्या बाळाची ७ लाखाची विक्री करण्याचा प्रकार ठाणे क्राईम ब्रॅंचने उघड केला. याप्रकरणी ५ जणांना अटक केली असून १० जणांचे पथक याबाबत चौकशी करण्यात आली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होम मध्ये एका लहान बाळाची खरेदी विक्री होत असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचला मिळाल्यावर, त्यांनी बुधवारी ३ वाजता धाड टाकण्यात आली. लहान मुलाच्या विक्रीचा सौदा होत असल्याची माहिती समाजसेविका सानिया हिंदुजा, राष्ट्रवादीचे सोनू पंजाबी यांना माहिती मिळाली होती. त्यांनी ठाणे क्राईम ब्रॅंचशी संपर्क साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, कृष्णा कोकणी, महिला पोलीस तेजश्री शेडके यांना माहिती दिली. महालक्ष्मी नर्सिंग होम मध्ये एका महिलेला बनावट ग्राहक बनून पाठवण्यात आल्याची माहीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

बनावट ग्राहक पाठविलेल्या महिलेने, मला दोन मुली असून मुलगा हवा आहे. असे या महिलेने सांगितल्यावर २२ दिवसाच्या बाळाचा ७ लाखात सौदा झाला. नसिंग होमच्या डॉ.चित्रा चैनानी यांच्या सहकारी काम करणाऱ्या संगीता, प्रतिभा आणि बेळगाव मधील डेमन्ना यांना ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ४ महिलांसह एक पुरुष आरोपी असे एकून ५ जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने पोलीस कस्टडी देण्यात आली. महालक्ष्मी नर्सिंग होम मधून किती लहान मुलांची विक्री करण्यात आली. याचा तपास कारण्यासाठी १० जणांचे पथक करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. दरम्यान या घटनेने उल्हासनगरात खळबळ उडाली असून यापूर्वीही लहान मुलाच्या खरेदी-विक्रीचे प्रकार झाल्याची माहिती राजकीय नेत्यांनी दिली. तसेच डॉक्टरी क्षेत्राला यामुळे गालबोट लागले आहे. लहान बाळाच्या विक्रीने खळबळ शहरात यापूर्वीही लहान बाळाची विक्री प्रकरण गाजले होते. यामध्येही नर्सिंग होमच्या डॉक्टरसह सहकार्याचा सहभाग असल्याचे उघड झाले. महालक्ष्मी नर्सिंग होम मध्येही आता पर्यंत किती बाळाची विक्री झाली. याचा तपास करण्यासाठी पथक नेमण्यात आले. 

ग्राहक बघून बाळाची किंमत २२ दिवसाच्या बाळाची ७ लाखाला विक्री झाल्याचा प्रकार उघड झाला तरी, ग्राहक बघून खरेदी-विक्री होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर