ठाणे : एका बांधकाम ठेकेदाराकडे रेतीच्या एका ट्रकमागे १२०० रुपयांची खंडणी मागणारा शिवसेनेचा आझादनगर येथील पदाधिकारी उमेश अग्रवाल, विरल शाह आणि देवेंद्र साळवी या तिघांना मंगळवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ७ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.विवियाना मॉल जवळील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे रेतीचा पुरवठा करणाºया ठेकेदाराला आझादनगर, गोकूळनगर विभागातील शिवसेनेचा पदाधिकारी अग्रवाल याने त्याच्या साथीदारांसह आठवडाभरापूर्वी खंडणीसाठी धमकी दिली होती. रेतीच्या एका टनामागे २०० रुपये देण्यात यावे. एका ट्रकमध्ये सहा टन रेती भरली जाते. त्यानुसार एका ट्रकसाठी १२०० रुपये देण्याची धमकी या तिघांनी एका ठेकेदाराला दिली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध २५ जानेवारी २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या पथकाने अग्रवालसह तिघांनाही सोमवारी अटक केली.
धक्कादायक! ठाण्यात खंडणी प्रकरणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:39 IST
ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला रेती पुरवठा करणा-या ठेकेदाराला खंडणीसाठी धमकी देणारा शिवसेना पदाधिकारी उमेश अग्रवाल याच्यासह तिघांना वर्तकनगर पोलिसांनी खंडणी प्रकरणात मंगळवारी अटक केली आहे.
धक्कादायक! ठाण्यात खंडणी प्रकरणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक
ठळक मुद्देठेकेदाराला खंडणीसाठी दिली होती धमकीएक आठवडयांपूर्वी झाला होता गुन्हा दाखल वर्तकनगर पोलिसांची कारवाई