शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धक्कादायक! आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी पोटच्या मुलाची गळा आवळून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 11:56 IST

कुठल्याही मुलाला आपल्या आईच्या कुशीत सर्वात जास्त सुरक्षित वाटत आणि आई सुद्धा आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी वाट्टेल ते संकट झेलायला तयार असते.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ममताचा मार्च 2016 मध्ये विरेंद्र कुमारबरोबर (28) विवाह झाला होता.मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ममता आणि राकेश दोघे उत्तर प्रदेशला त्याच्या गावी पळून गेले होते.

ठाणे - कुठल्याही मुलाला आपल्या आईच्या कुशीत सर्वात जास्त सुरक्षित वाटत आणि आई सुद्धा आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी वाट्टेल ते संकट झेलायला तयार असते. पण ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये बिलकुल या उलट घटना घडली आहे. आईनेच प्रियकराच्या साथीने पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी ममता यादव तिचा प्रियकर राकेश पटेल (30) आणि अमित कुमार (19) या तिघांना अटक केली आहे. अमित कुमार राकेशचा मित्र आहे. अमितने दोघांना मुलाचा मृतदेह पुरण्यासाठी मदत केली म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ममताचा मार्च 2016 मध्ये विरेंद्र कुमारबरोबर (28) विवाह झाला होता. या जोडप्याला एक मुलगा होता. भिवंडीच्या दापोडा गावामध्ये यादव कुटुंब आनंदात राहत होते. विरेंद्र गोदामामध्ये नोकरी करतो. या कुटुंबाच सर्वकाही सुरळीत सुरु असताना ममताची त्या परिसरात राहणा-या राकेशबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ममता आणि राकेश दोघे उत्तर प्रदेशला त्याच्या गावी पळून गेले होते. अलीकडेच ते भिवंडीला परतले होते. ममता राकेश आणि तिचा एक वर्षांचा मुलगा आर्यन एकत्र राहत होते. त्या दोघांना आर्यन पासून सुटका करुन घ्यायची होती. 

त्यांच्या नात्यामध्ये आर्यन त्यांना अडथळा ठरत होता. त्यामुळे मंगळवारी रात्री ममता आणि राकेशने मिळून आर्यनची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर भिवंडीच्या मानकोली इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात अमितच्या मदतीने त्यांनी आर्यनचा मृतदेह पुरला.  विरेंद्रला जेव्हा ममतासोबत मुलगा दिसला नाही तेव्हा त्याने चौकशी केली. पण ममताकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही त्यामुळे त्याचा संशय वाढला. ममता उडवाउडवीची उत्तरे देत होती. अखेर विरेंद्रने नारपोली पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांच्या चौकशीत ममताने पोटच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.  

टॅग्स :MurderखूनArrestअटक