शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या धाडीनंतर धक्कादायक माहिती आली समोर: संदपमध्ये पाणी चोरी नाहीच?

By अनिकेत घमंडी | Updated: March 14, 2023 18:22 IST

Dombivali: उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याकडे आलेल्या पाणीचोरीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीत संदप गावादरम्यान येऊन पाणी चोरीच्या तक्रारी आल्या असून महापालिका प्रशासनाने त्याची तात्काळ तपासणी करून माहिती देण्याचे आदेश दिले.

डोंबिवली - उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याकडे आलेल्या पाणीचोरीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीत संदप गावादरम्यान येऊन पाणी चोरीच्या तक्रारी आल्या असून महापालिका प्रशासनाने त्याची तात्काळ तपासणी करून माहिती देण्याचे आदेश दिले.

मंत्र्यांच्या धाडीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पथक मंगळवारी संदप गावात दाखल झाले. सामंत यांनी सांगितलेल्या तिन्ही ठिकाणी पाहणी केली असता पाणी चोरी होतच नसल्याची धक्कादायक माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली, त्यामुळे मंत्री सामंत यांच्याकडे आलेल्या तक्रारीत तथ्यता नव्हतेच का अशी उलट सुलट चर्चा शहरात सुरू आहे. तेथे नळ जोडणी अनधिकृत आहेत का? पाण्याची चोरी सुरू आहे का? याची तपासणी महापालिकेने सुरू केली. त्यामधील सामंत यांनी आक्षेप घेतलेल्या एका मिनरल पाणी बाटल्याच्या कारखान्याला बोअरवेलचे पाणी असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते, मात्र संबंधित मालकाने बोअरिंगची परवानगीची कागदपत्र महापालिकेला सादर केली असून त्याची शहानिशा सुरू असल्याचं महापालिका अधिकाऱ्यानी सांगितलं.

सध्याच्या चौकशीत पाणी चोरी नसल्याचे दिसून येत आहे दुसऱ्या ठिकाणी देखील अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी देखील पाणी चोरी आढळून आली नाही आता तिसऱ्या ठिकाणी पाहणी होणार आहे मात्र ज्या प्रकारे मंत्री महोदयांनी पाणी चोरीबद्दल खुलासा केला होता तशी परिस्थिती दिसून न आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये भेडसावणार्या पाणीटंचाईची शासनाने दखल घेतली आहे. २७ गावांमधील संदप गाव परिसरात टँकर माफियांकडून मोठ्या प्रमाणात पालिकेच्या पाईप लाईन मधून पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या . या पार्श्वभूमीवर काल उद्योग मंत्री उदय सन्मान यांनी संदप परिसरात तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. त्या ठिकाणी टॅपिंग करत पाण्याचा कारखाना तर दोन ठिकाणी टॅपिंग करत टँकर भरला जात असल्याचे उघडकीस आणले. त्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून त्याचीही चौकशी करण्यात आली आहे.

मंत्र्यांच्या धाडीनंतर खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाचे पथक आज संदप गावात दाखल झाले . त्यांनी मिनरल वॉटर च्या प्लांट्स इतर दोन ठिकाणी देखील तपासणी सुरू केलीये . सध्या या मिनरल वॉटरच्या प्लांटमध्ये पाणी कुठून येते तसंच इतर दोन ठिकाणी कुठली पाण्याची पाईपलाईन आहे याबाबत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी पहिल्या ठिकाणी तपासणी झाली असून मिनरल प्लांटमध्ये बोरिंग मधून पाणी येते सदर बोरिंग चे संबंधित मालकाकडे परवानगी असून ते परवानगी पत्र ते महापालिकेला सादर करणार असल्याचे सांगितले. तीन पैकी आतापर्यंत दोन ठिकाणी पाणी चोरीची तथ्यता नसल्याचे आढळून आले आहे. 

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या पाहणीत पाणी चोरी संदर्भात कोणतीही तथ्यता आढळून आली नाही, पण त्यानिमित्ताने कोंबिंग ऑपरेशन करून बहुतांशी ठिकाणची पाहणी करण्यात आली. -  किरण वाघमारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी

त्या घटनेत घटनास्थळी गेल्यावर टँकर आढळून आले, त्यात पाणी कुठून येते, ते वैध असते की नाही याचा तपास सुरू असून सध्या त्या विषयात तीन जणांवर गुन्हे दाखल।करण्यात आले आहेत, आणि चौकशी सुरू आहे -  शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे

टॅग्स :Uday Samantउदय सामंतdombivaliडोंबिवली