शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मित्राचा खून करुन मृतदेह कुत्र्याचा असल्याची ‘त्याने’ केली रिक्षा चालकाला बतावणी

By जितेंद्र कालेकर | Updated: September 8, 2020 23:06 IST

धक्कादायक बाब म्हणजे या खूनानंतर गोणीत मृतदेह भरुन तो कुत्र्याचा असल्याचे त्याने रिक्षा चालकाला भासविले. नंतर रिक्षाने हा मृतदेह वसई खाडीकडे नेऊन पूलावरुन ती गोणीच खाडीत फेकून दिल्याची बाब समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देठाण्यातील भयंकर घटनाकासारवडवली पोलिसांनी उघड केला प्रकारपूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून करणाऱ्यास अटक मृतदेह गोणीत भरुन टाकला वसईच्या खाडीत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पूर्ववैमनस्यातून अक्षय हेमंत डाकी (२०, रा. वाघबीळ, ठाणे) या तरुणाचा खून करणा-या धनराज तरुडे (३०) या त्याच्याच मित्राला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खूनानंतर गोणीत मृतदेह भरुन तो कुत्र्याचा असल्याचे त्याने रिक्षा चालकाला भासविले. नंतर रिक्षाने हा मृतदेह वसई खाडीकडे नेऊन पूलावरुन ती गोणीच खाडीत फेकून दिल्याची बाब समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.घोडबंदर रोड वाघबीळ येथील रहिवाशी हेमंत डाकी (४५) या रिक्षा चालकाने त्यांचा मुलगा अक्षय याच्या खून आणि अपहरण तसेच खूनाचा पुरावा नष्ट केल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर रोजी दाखल केली होती. या तक्रारीनुसार अक्षय याला घोडबंदर रोडवरील पानखंडा परिसरात अपहरण करुन नेले. नंतर त्याच्यावर हत्याराने वार करुन त्याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरुन वसई खाडी येथील ब्रिजवरुन खाडीच्या पाण्यात टाकून दिला. हा प्रकार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते ४ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे धनराजला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याने हा खून नेमकी कोणत्या कारणासाठी केला? कशा प्रकारे केला? या सर्व बाबींचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कुत्र्याचा मृतदेह असल्याचा रिक्षा चालकाकडे केला बहाणाअक्षयच्या खूनानंतर त्याचा मृतदेह कथित आरोपी धनराज याने एका गोणीत भरला. या गोणीमध्ये कुत्र्याचा मृतदेह असून ते खाडीत टाकायचे असल्याचे एका रिक्षा चालकाला त्याने सांगितले. त्याच रिक्षाने हा मृतदेह त्याने वसई खाडीकडे नेला. नंतर तिथून तो खाडीत फेकून दिला. ही माहिती रिक्षा चालकाकडून पोलिसांना मिळाल्यानंतर खून करणा-या धनराजनेही या खूनाची कबूली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. खाडीत मृतदेह फेकला त्यावेळी समुद्राला ओहोटी असल्यामुळे हा मृतदेह मंगळवारी उशिरापर्यंत हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMurderखूनArrestअटक