शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अवघ्या दहा रुपयांसाठी कळव्यात मित्राचा खून: चौकडीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 00:51 IST

दारुसाठी दहा रुपयांची मागणी करणाऱ्या सुरेश भागोजी बाकाडे (३५) या मित्राचा खून करणाºया चौकडीपैकी संदीप चव्हाण (२६) याला मंगळवारी कळवा पोलिसांनी अटक केली आहे. संदीपने पैसे देण्यास नकार दिल्याने सुरेशने शिवीगाळ केली. त्यामुळे संदीपसह चौघांनी सुरेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यु झाला.

ठळक मुद्देदारुसाठी मागितले होते पैसेकळवा पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दारुसाठी दहा रुपयांची मागणी करणा-या सुरेश भागोजी बाकाडे (३५, रा. घोलाईनगर, कळवा, ठाणे) या मित्राचा खून करणा-या चौकडीपैकी संदीप चव्हाण (२६, रा. घोलाईनगर, कळवा) याला मंगळवारी कळवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.कळव्यातील घोलाईनगर भागातच सुरेश याच्यासह त्याचे चौघेही मित्र वास्तव्याला आहेत. १४ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४५ ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घोलाईनगरकडे जाणाºया रस्त्यावर या चौघांनी दारुच्या नशेतील सुरेश याला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत बेशुद्ध पडून त्याचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि पोलीस निरीक्षक आजगावकर यांच्या पथकाने संतोष गायकवाड (२५) आणि पप्पू दुबे (३०) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी कल्पेश चव्हाण याला तर संदीप चव्हाण या सूत्रधाराला मंगळवारी (१७ नोव्हेंबर रोजी ) अटक केल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर यांनी सांगितले. दारुसाठी दहा रुपयांची मागणी केल्यानंतर संदीपने सुरेशला नकार दिला. त्यानंतर सुरेशने शिवीगाळ केल्यामुळे संदीपसह चौघांनी सुरेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यु झाला. चौघांनाही २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून