शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पाच हजारांमध्ये दिली होती पत्नीच्या हत्येची सुपारी: फरारी आरोपीस २० वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 19:35 IST

तब्बल २० वर्षांपूर्वी पाच हजारांची सुपारी घेऊन एका महिलेची हत्या करणाऱ्या शंभू मनुभाई रावल (४६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने गुरुवारी अटक केली आहे. त्याने अन्य एका साथीदाराच्या मदतीने कुंदा (३५ ) या महिलेची हत्या केली होती.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई गुजरात येथून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपल्याच पत्नीच्या हत्येसाठी पाच हजारांची सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणल्याचा प्रकार २० वर्षांपूर्वी ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे घडला होता. याच खूनातील एक आरोपी शंभू मनुभाई रावल (४६, रा. गवाडा, जि. मेहसाना, गुजरात) याला तब्बल २० वर्षांनी गुजरात राज्यातील मेहसाना जिल्ह्यातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याने अन्य एका साथीदाराच्या मदतीने कुंदा (३५ ) या महिलेची हत्या केली होती.ठाण्यातील वागळे इस्टेट, रघुनाथनगर भागात राहणारी कुंदा रावल आणि तिचा पती कुंदन रावल यांच्यात नेहमीच खटके उडत होते. या नेहमीच्या भांडणाला कंटाळून कुंदन याने आपल्याच पत्नीची हत्या करण्यासाठी शंभू आणि सुरेश मनीलाल नाव्ही या दोघांना पाच हजार रु पयांची सुपारी २००० मध्ये दिली होती. त्यानंतर दोघांनी मिळून कुंदाची हत्या करून पलायन केले होते. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. दोघेही आरोपी गेली २० वर्ष फरार होते. दरम्यान, आरोपी शंभू रावल हा त्याच्या गुजरात राज्यातील मूळ गावी वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार युनिट एकचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव आणि उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांच्या पथकाने गुजरात पोलिसांच्या मदतीने मदतीने शंभू याला १५ आॅक्टोबर रोजी गवाडा ( जि. मेहसाना ) येथून ताब्यात घेतले. याच खूनातील दुसरा आरोपी सुरेश मनीलाल नाव्ही हा मात्र ५ डिसेंबर २०१५ मध्ये मृत पावल्याची माहिती चौकशीमध्ये त्याने या पथकाला दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून