शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात केवायसी करण्याच्या नावाखाली जेष्ठ नागरिकाची आठ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:14 IST

‘तुमचे पेटीएम बंद झाले असून तुमची केवायसी रिन्यू करावी लागणार आहे’, अशी बतावणी करीत ठाण्यातील एका जेष्ठ नागरिकाची सात लाख ९९ हजार ९९७ रुपयांची राहूल मिश्रा नामक भामटयाने आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला.

ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपेटीएम आणि एनईएफटीद्वारे काढली रोकड

लोकमत न्यून नेटवर्कठाणे: केवायसीचे नूतनीकरण करायचे असल्याची बतावणी करुन नौपाडयातील ६४ वर्षीय जेष्ठ नागरिकाची सात लाख ९९ हजार ९९७ रुपयांची राहूल मिश्रा नामक भामटयाने आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाण्याच्या खोपट भागातील हे तक्रारदार व्यावसायिक आपल्या घरी असतांना १५ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर राहूल मिश्रा या अनोळखी व्यक्तीने फोन केला. तुमचे पेटीएम बंद झाले असून ‘तुमची केवायसी रिन्यू करावी लागणार आहे’, अशी त्याने त्यांना बतावणी केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या जेष्ठ नागरिकाने गुगलद्वारे एका नविन अ‍ॅप आणि कॅनरा बॅकेचे मोबाईल अ‍ॅप चालू केले. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून त्याने दुपारी ४ वाजून १२ मिनिट ते ७ वाजून १४ मिनिटांच्या कालावधीमध्ये त्यांचे पेटीएम आणि कॅनरा बँकेच्या एनईएफटीद्वारे सात लाख ९९ हजार ९९७ रुपयांची रक्कम अन्य बँक खात्यामध्ये आॅनलाईन वळती केली. या जेष्ठ नागरिकाने नंतर बँकेशी संपर्क साधला असता, बँकेने अशी कोणतीही केवायसी मागितली किंवा नूतणीकरणासाठी विचारणा केली नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी त्यांनी १६ एप्रिल रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी राऊत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी