शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आठवले गटावरही शिवसेनेचा गळ

By admin | Updated: January 26, 2017 03:13 IST

शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आल्यावर शिवसेनेने साई पक्षासोबतच आता रिपाइंच्या आठवले गटावरही युतीचा गळ टाकला आहे. साई पक्षासोबत

सदानंद नाईक / उल्हासनगरशिवसेना-भाजपची युती संपुष्टात आल्यावर शिवसेनेने साई पक्षासोबतच आता रिपाइंच्या आठवले गटावरही युतीचा गळ टाकला आहे. साई पक्षासोबत गुरूवारी शिवसेनेची जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे. उल्हासनगरच्या महापालिका निवडणुकीत नैसर्गिक मित्र असलेल्या शिवसेनेला डावलल्याने भाजपासह ओमी टीमला धडा शिकविण्यासाठी त्या पक्षाने कंबर कसली आहे. ‘शत्रुचा शत्रू’ हा आपला मित्र हा राजकीय डावपेच प्रत्यक्षात आणत शिवसेनेने साई पक्षासोबत युतीची बोलणी सुरू केली. त्यासाठी दोन्ही पक्षाची गुरूवारी बैठक होईल, असे साईचे जीवन इदनानी व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. शिवसेनेचा मराठी भागात, तर साई पक्षाची सिंधी परिसरात ताकद आहे. दोन्ही पक्षांना परस्परांचा फार फायदा होणार नसला, तरी एकत्रित संपूर्ण जागा लढविण्याचे समाधान या युतीला मिळेल. मराठीबहुल परिसरापैकी चोपडा कोर्ट, खेमानी परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकरनगर, रमाबाई आंबेडकरनगर, डम्पिंग ग्राऊंड परिसर, सम्राट अशोकनगर, सुभाषटेकडी, गायकवाड पाडा, ओटी सेक्शन आदी परिसरात रिपाइंतील अनेक गटातटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेने एकीकडे साई पक्षासोबत युतीची बोलणी सुरू ठेवत रिपाइंच्या आठवले गटासह अनेक स्थानिक पक्ष नेते व इतर रिपाइंच्या गटाशी संपर्क ठेवल्याची माहिती चौधरी यांनी दिली.रिपाइंच्या गटाशी भाजपाने आधी जागावाटप केले आहे. मात्र त्यातील काही जागा त्यांनी परस्पर ओमी कलानी यांच्या गटाला देऊ केल्याने हा आठवले गट नाराज आहे. त्यांना चुचकारून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आता शिवसेनेने सुरू केला आहे.