शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सहा प्रभाग समितींवर शिवसेनेचा कब्जा, राष्ट्रवादीच्या वाटेला दोन तर भाजपाच्या वाटेला एक प्रभाग समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:50 IST

नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनाला नऊ तर भाजपाला सात मते पडली. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाटेला सहा प्रभाग समिती, राष्ट्रवादीच्या वाटेला दोन आणि भाजपाच्या वाटेला एक प्रभाग समिती आली आहे.

ठळक मुद्देकळवा आणि मुुंब्रा प्रभाग समिती राष्ट्रवादीकडेउथळसर प्रभाग समितीवर भाजपाचे वर्चस्वशिवसनेने नौपाडा प्रभाग समिती राखली

ठाणे - मागील नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणुकीची प्रक्रिया अखेर बुधवारी पार पडली. त्यानुसार सात प्रभाग समित्यांची अध्यक्षांची निवड यापुर्वीच बिनविरोध झाली होती. दरम्यान बुधवारी नौपाडा आणि कळव्यासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यावेळी कळव्यासाठी शिवसेनेने आपला अर्ज मागे घेतल्याने येथील निवडही बिनविरोध झाली. परंतु नौपाड्यासाठी शिवसेना विरुध्द भाजपा अशी लढत झाली. यामध्ये शिवसेनेला ९ तर भाजपाला सात मते पडली. त्यामुळे या प्रभाग समितीवर देखील शिवसेनेने कब्जा केला. त्यानुसार आता शिवसेनेच्या ताब्यात सहा, राष्ट्रवादी  दोन आणि भाजपाच्या वाटयाला एक प्रभाग समिती आली आहे.ठाणे महापालिकेत एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समितीसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच इतर समित्यांच्या देखील निवडणुका रखडल्या होत्या. परंतु नऊ महिन्यानंतर प्रभाग समितीच्या निवडणुका लागल्या. मागील महिन्यात महासभेत शहरातील प्रभागाची पुनर्रचना करण्यात आली. दहा प्रभाग समिती एकने कमी करुन नऊ करण्यात आल्या. त्याची निवडणुक बुधवारी पार पडली. त्यानुसार मागील आठवड्यात या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आले. त्यानुसार कोपरी- नौपाडा येथे शिवसेना आणि भाजपात चुरस लागली होती. येथे शिवसेनेचे नऊ नगरसेवक तर भाजपाचे सात नगरसेवक आहेत. भाजपाला ही प्रभाग समिती हवी होती. त्यामुळेच त्यांच्या पक्षातील सुनेशी जोशी यांनी अर्ज भरला होता. तर शिवसेनेच्या वतीने शर्मिला गायकवाड यांनी अर्ज भरला होता. बुधवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली आणि भाजपाला सात आणि शिवसेनेला नऊ असे मतदान झाले. त्यानुसार शर्मिला गायकवाड या आता नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षा झाल्या आहेत. तर कळवा प्रभाग समितीसाठी शिवसेनेच्या वतीने पुजा करसुळे यांनी अर्ज भरला होता. परंतु आज निवडणुकीच्या वेळेस त्यांनी अर्ज मागे घेतला. तशीही ही प्रभाग समिती राष्ट्रवादीच्याच वाटेला जाणार होती. त्यानुसार आता राष्ट्रवादीचे महेश साळवी हे अध्यक्ष झाले आहेत.दरम्यान उथळसर प्रभाग समितीत नंदा पाटील (भाजपा), वागळे माणिक पाटील, माजिवडा मानपाडा सिधार्थ ओवळेकर, वर्तकनगर - रागीणी बैरीशेट्टी, लोकमान्य सावरकरनगर - कांचन चिंदरकर, नव्याने तयार झालेल्या दिवा प्रभाग समितीत शैलेश पाटील या सर्व शिवसेना नगरसेवकांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. तर मुंब्रा प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादीच्या अनिता केणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाElectionनिवडणूक