शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराकडून शिवसेनेला पाकीट

By admin | Updated: February 16, 2017 01:50 IST

नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे परिवहन सेवेला ८१७ कोटींचा तोटा झाला आहे. अनेक गाड्या तर भंगारातही गेल्या.

ठाणे : नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे परिवहन सेवेला ८१७ कोटींचा तोटा झाला आहे. अनेक गाड्या तर भंगारातही गेल्या. गोल्डी या ठेकेदारामुळे तर शिवसेनेला लाखो रुपयांचे पाकीट मिळते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. एकीकडे, भाजपा राष्ट्रवादीच्या बाटलीने दूध पित असल्याचा आरोप शिवसेनेने केला असतानाच ‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाचे ‘निप्पल’ मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या तोंडात दिले आहे, याचाही शोध घ्यावा, असा पलटवारही त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवण्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपा अपयशी ठरले आहे. सार्वजनिक परिवहन हा शहरातील प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय असतानाही सत्ताधाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच ठाणेकरांना एखाद्या जनावराप्रमाणे टीएमटीतून प्रवास करावा लागतो, असा आरोप त्यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. एक लाखाच्या लोकसंख्येला ३० बसची गरज लक्षात घेता, ठाणे शहरातील ३० लाखांच्या लोकसंख्येला ६६० बस हव्यात. परंतु, टीएमटीच्या ताफ्यात अवघ्या ४०० बस आहेत. त्यापैकी २०९ भंगारात, तर ७४ बसची विक्री झाली. त्यामुळे केवळ १८० बस या रस्त्यावर आहेत. त्यामुळे टीएमटीच्या प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी घटलेली आहे. अनेक बसेस या नादुरुस्त असल्याने परिवहनला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेमधून परिवहनच्या ताफ्यात ६३ साध्या तर, ३० नवीन वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. जुन्या आणि नव्या अशा २०० बस रस्त्यावर असून त्या खासगी ठेकेदाराला चालवायला दिल्या आहेत. त्यासाठी खासगी ठेकेदार किलोमीटरमागे ५३ रुपये दर आकारत आहे. नवी मुंबईत हाच दर ३५ रुपये आहे. हा ठेकेदार १८ रुपये अधिक आकारत असून त्यातील १० रुपये हे शिवसेनेचा पॉकेटमनी असल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)