शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या शिवमंदिराला धाेका; पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 10:21 IST

प्राचीन वारसा असलेल्या मंदिराचे अस्तित्व धोक्यात

अंबरनाथ : शहरातील प्राचीन शिवमंदिराची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. हे मंदिर तब्बल ९६२ वर्षे जुने असून, शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. हे शिवमंदिर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना समजले जाते. १०६० मध्ये शिलाहार राजा मम्बवाणी यांनी या शिवमंदिराची निर्मिती केली होती. आता त्याची पडझड व्हायला सुरुवात झाली आहे. कारण ज्या पुरातत्व खात्याकडे या मंदिराची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून हा वारसा जतन करण्यासाठी काहीही उपायोजना केल्या जात नाहीत. प्राचीन मंदिराच्या आवारात १५ वर्षांपूर्वी दगडी फरशा बसवल्या होत्या. त्यावेळी मंदिराला काही ठिकाणी तडे आणि भेगा पडल्याचे निदर्शनास आल्याने पुरातत्व खात्याने तडे बुजविले होते. मात्र, त्यानंतर मंदिराच्या डागडुजीकडे पुरातत्व खात्याने लक्षच दिलेले नसल्याची मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांचा आरोप आहे. या मंदिराची डागडुजी आणि देखभाल दुरुस्ती आम्ही करायला तयार आहोत, मात्र पुरातत्व खात्याच्या जाचक अटींमुळे मंदिराला साधा हळदीचा टिक्काही लावता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महाशिवरात्र तसेच अन्य दिवशीही भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. पुरातत्त्व विभागाचा नाकर्तेपणाभग्नावस्थेतील मूर्तीची दुरुस्तीची जबाबदारी ही केवळ पुरातत्त्व विभागाची आहे. मात्र, दुरुस्तीसाठी अद्याप कोणताही प्रयत्न केलेला नाही. नगरपालिकेने शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्या प्रकल्पात मंदिराच्या दुरुस्तीचा विषय येण्याची गरज आहे. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी होतो. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या नाकर्तेपणामुळे कोणत्याही कामाची संधी आयोजकांना मिळत नाही.निधीची ओरड असल्याने त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, नेमके काम काय करावे, याबाबत पुरातत्व विभाग योग्य माहिती देत नाही.  मंदिराच्या शेजारून सांडपाणी वाहत असल्याने ते वाहून नेण्यासाठी भुयारी मार्गाची गरज आहे. मात्र, परवानगीअभावी परिसराचा विकास रखडला आहे.दुर्मीळ मूर्तींचा समावेशअंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराला तीन दरवाजे असून, मंदिराच्या बाहेरच्या भागावर सर्व बाजूंनी देवदेवतांच्या सुबक मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. यामध्ये अनेक दुर्मीळ मूर्तींचाही समावेश आहे. मात्र, या सगळ्या मूर्तींची झीज होत चालली असून, काही मूर्ती भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे पुढच्या पिढीसाठी जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र संबंधित विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.