शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिकेतील भ्रष्टाचार समस्यांबाबत शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन 

By नितीन पंडित | Updated: February 2, 2023 16:43 IST

येत्या आठवड्यात या बाबत उपाययोजना न केल्यास पालिका प्रशासना विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी दिला.

भिवंडी :  भिवंडी शहरातील विविध समस्यांबाबत पत्रव्यवहार करून सुद्धा त्या सोडवणुकीसाठी पालिका प्रशासन निरुत्साही असल्याने शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी आयुक्तांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. भिवंडी महानगरपालिकेच्या करमुल्यांकन विभागाच्या संगणकातून २७ लाख रुपयांची नोंद गायब करुन भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती कामाला तात्काळ सुरवात करावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन आश्वारुढ पुतळा उभारणीच्या कामास होणारी दिरंगाई, काप आळी येथे स्व.आप्पासाहेब पड्याळ चौक उभारण्यास होत असलेली टाळाटाळ, शहरातील नादुरुस्त रस्ते अशा विविध समस्यांवर आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांना निवेदन दिले. 

तसेच, येत्या आठवड्यात या बाबत उपाययोजना न केल्यास पालिका प्रशासना विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी दिला. या शिष्टमंडळात शिवसेनेचे शहर सचिव महेंद्र कुंभारे, शहर समन्वयक नाना झळके, विधानसभा सचिव गोकुळ कदम, उपशहरप्रमुख राकेश मोरे, निलेश केकाण, भाई वनगे, मनोज पाटील, विभागप्रमुख गजेंद्र गुळवी, संतोष भावार्थे, शाखाप्रमुख भाऊ काठवले, आकाश देवकर, स्वप्निल जोशी, अर्जुन साळुंखे इत्यादी पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडी