शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतही शिवसेनेत बंड!, स्थानिकांना डावलून पदाधिकारी लादण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:58 IST

पालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून पालिका हद्दीबाहेरील व्यक्तीची निवड करण्याचा आदेश दिल्याने नाराज शिवसैनिकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे

भिवंडी : पालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून पालिका हद्दीबाहेरील व्यक्तीची निवड करण्याचा आदेश दिल्याने नाराज शिवसैनिकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. पालकमंत्र्यांनी या नियुक्तीत हस्तक्षेप करू नये, असा आक्षेप काही नगरसेवकांनी घेतला असून यानंतरही ग्रामीण भागातील उमेदवार लादला, तर त्याचा परिणाम लोकसभा- विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल, असा इशारा दिल्याने वातावरण चिघळले आहे.एकीकडे भिवंडीतील १८ नगरसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याने भिवंडीतील राजकीय चित्र बदलेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच स्वीकृत सदस्य निवडीवरून वातावरण तापले आहे. त्यातच शहापूरपाठोपाठ भिवंडीतही पक्षातील नाराजी उफाळून आली आहे.सहा महिन्यापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस ४७, भाजपा २०, शिवसेना १२, समाजवादी २, कोनार्क विकास आघाडी ४, अपक्ष २, आरपीआय (ए) ४ असे पक्षीय बलाबल आहे. सध्या स्वीकृत सदस्यासाठी मोठे अर्थकारण सुरू आहे. नगरसेवकांच्या संख्येनुसार काँग्रेसचे तीन, शिवसेनेचा एक आणि भाजपाचा एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेत आतापर्यंत २० जणांनी शहरप्रमुख सुभाष माने यांच्याकडे नावे दिली आहेत. ही स्पर्धा तीव्र असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेळीचे माजी सरपंच आणि एमएमआरडीए सदस्य देवानंद थळे यांच्या नावाची शिफारस केल्याने शिवसैनिकांसह नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजीची लाट उसळली. शिंदे यांच्या निर्णयावर विचारासाठी शहरप्रमुख सुभाष माने यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उपमहापौर मनोज काटेकर यांच्या दालनात नगरसेवक व पदाधिकाºयांच्या मिटींगला गटनेते संजय म्हात्रे, मदन नाईक, बाळाराम चौधरी यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. त्यात स्थानिक पदाधिकारी किंवा शहरातील शिवसैनिकांच्या नियुक्तीची मागणी पुढे आली. पालकमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करू नये, असा सूर लावत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. स्थानिक पदाधिकाºयांलाच सदस्यपद मिळावे, या मागणीसाठी शिवसेनेचे नगरसेवक एकवटले असून त्यांनी पालकमंत्र्यांविरोधात बंडाची भाषा सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून शिवसैनिकांत पसरलेलेला संताप कमी होत नाही, तोच ही बंडाची भाषा सुरू झाली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना