शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात पुन्हा शिवसेनेच्या पक्षबांधणीला सुरूवात. संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीतीतील नियोजन

By पंकज पाटील | Updated: August 9, 2022 19:27 IST

Shiv Sena: बदलापूरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

- पंकज पाटीलबदलापूर: बदलापूरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा बदलापुरात शिवसेना पक्षबांधणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

नुकतेच शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख  रुपेश म्हात्रे यांनी बदलापुरात किशोर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी बदलापुरात पुन्हा शिवसेना बळकट करण्याच्या दृष्टीने कशाप्रकारे पक्षबांधणी करावी लागेल, काही कारणास्तव मुख्य प्रवाहातून बाजूला गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, ज्या पदाधिकाऱ्यांना वा माजी नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत यायची इच्छा असेल त्यांच्याशी कशाप्रकारे संपर्क साधायचा आदी विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. बदलापूरातील काही माजी नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून रुपेश म्हात्रे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे योग्य नियोजन करून पक्षबांधणी केली जाणार असून त्यामुळे निश्चितच बदलापुरात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वासही किशोर पाटील यांनी व्यक्त केला.

चार दिवसांपूर्वीच बदलापूरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख किशोर पाटील, माजी नगरसेवक बाळा पातकर, माजी उपनगराध्यक्ष प्रिया गवळी, उपशहर प्रमुख प्रशांत पालांडे, गिरीश राणे , नरेश मेहेर , संतोष शिंदे ,विलास हंकारे, श्याम शिंदे, रामलू डोरापल्ली, लक्ष्मीकांत कौसुंदर, बाळकृष्ण पाटील, कुणाल साळवे, धनंजय पावसकर,  तेजस गंद्रे, आदींसह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपली निष्ठा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी व मातोश्री सोबत आहे आणि राहील, असे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे आगामी काळात पक्ष बांधणीत व शिवसंवाद यात्रेला बदलापुरात पूर्वीचाच जोश व उत्साह दिसून येईल,अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे लवकरच बदलापुरात शिवसेना पक्षबांधणीच्या हालचाली सुरू होतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार या हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत असून आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाbadlapurबदलापूर