शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या निषेधार्थ शिवसेनेची बॅनरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:06 IST

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावलेली झाडे समाजकंटकांनी जाळली.

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावलेली झाडे समाजकंटकांनी जाळली. या प्रकरणातील संशयितांविरोधात कारवाई केली जात नसल्याने शिवसेनेतर्फे ठाण्यामध्ये कोपरी येथील वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन करून अधिकाºयावर राख फेकण्यात आली. यानंतर शिवसैनिकांसह खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक करण्यात आली होती. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने सरकारविरोधात बॅनरबाजी केली आहे. संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहरांत हे बॅनर झळकले आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनाही सहभागी असल्यामुळे सरकार नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी हे बॅनर लावले आहेत. याविषयी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र संघटक अरविंद मोरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडून अन्याय होत असल्यास अन्यायकारक गोष्टींवर बोट ठेवा. जाब विचारा, असे सांगितले आहे.खासदार शिंदे यांनी मांगरूळच्या डोंगरावर लोकसहभागातून लाखो झाडे लावली होती. यापूर्वीही या ठिकाणी आगी लावण्यात आल्या होत्या. पुन्हा या ठिकाणी समाजकंटकांनी एक लाख झाडे जाळली. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आंदोलन करून अधिकाºयांना जाब विचारला. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई करून शिवसैनिकांसह खासदारांना अटक केली. त्याचा निषेध आम्ही केला आहे. त्यात गैर काहीच नव्हते. विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेलाच पार पाडावी लागत आहे.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणले की, झाडे जाळली ही बाब चुकीची आहे. झाडे जाळणाºयांविरोधात कारवाई केली पाहिजे या मागणीला आमचे समर्थन आहे. खासदारांनी जसे कार्यालयात जाऊन आंदोलन केले तसे मनसेने केले असते तर पोलिसांनी आमच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असता. मग खासदारांना तोच न्याय का लावला नाही. शिवसेनेने सरकारचा केलेला निषेधही बेगडी आहे.शिवसैनिकांना गुन्ह्यातून का वगळले, वन कर्मचाºयांचा सवालआंदोलनाच्यावेळी शिवसैनिकांनी मुग्य वनअधिकारी राजेंंद्र कदम यांच्या कार्यालयात जाऊन राख फेकली होती. कदम यांच्या अंगावर शाईदेखील फेकली होती.सरकारी कामात अडथळा आणल्यास भादंविचे कलम ३५३ नुसार कारवाई केली जाते. मग शिवसैनिकांना यातून का वगळले, असा प्रश्न वन कर्मचाºयांनी केला.

टॅग्स :thaneठाणे