शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शिवसेनेचा डोंबिवलीत खांदेपालटाचा धमाका, तोंडाला काळे फासण्याचे प्रकरण भाऊ चौधरींना भोवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:47 AM

डोंबिवली : भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी असलेल्या भाऊ चौधरी यांच्या तोंडाला काळे फासल्याने संतप्त झालेल्या जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील राजेश मोरे यांची नेमणूक केली.

डोंबिवली : भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी असलेल्या भाऊ चौधरी यांच्या तोंडाला काळे फासल्याने संतप्त झालेल्या जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील राजेश मोरे यांची नेमणूक केली. यातून महापौर राजेंद्र देवळेकर हटाव मोहिमेत सहभागी असलेल्या गटाला पद देत शिंदे यांनी त्यांनाही सांभाळून घेतल्याची शिवसैनिकांची भावना आहे. मोरे हे उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे यांचे समर्थक आहेत आणि म्हात्रे यांचे पुत्र दीपेश हे महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत.अर्थात मोरे यांच्या पत्रावर मे अखेरची तारीख असल्याने ही नियुक्ती ताजी आहे की तो निर्णय आधीच झाला होता, याची चर्चा रंगली आहे. भाऊ चौधरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक म्हणून जबाबदारी देत त्यांना शहराच्या राजकारणातून दूर केल्याचे मानले जाते. त्यामुळेच त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याने पक्षांतर्गत धुसफूस समोर आली आहे.कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीनंतर मोरे यांना सभागृह नेतेपद देण्यात आले. नंतर स्थायी समितीचे सदस्यत्व आणि आता शहरप्रमुखपद देण्यात आल्याने एका गटाला झुकते माप देण्यात आल्याची चर्चा शिवसेनेत आहे. देवळेकर यांच्या महापौरपदाची मुदत संपल्यानंतर आपल्याला ते पद मिळावे, यासाठी दीपेश म्हात्रे प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते.पालकमंत्री एकनाथ शिंंदे यांनी कल्याण-डोंबिवलीतील निवडक पदाधिकाºयांना सोमवारी ठाण्यात बोलावून या घोषणा केल्या. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, भाऊ चौधरी यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.भाऊ चौधरी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेची गाढवावरुन प्रतिकात्मक धिंड काढली होती. त्यानंतर भाजपाचे डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष-नगरसेवक महेश पाटील यांनी चौधरींच्या तोंडाला काळे फासल्यामुळे काही काळ शहरात तणाव होता. या घटनेची पालकमंंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली होती. असा शहरप्रमुख आम्हाला नको, अशी जाहीर भूमिका घेण्यापर्यंत तेव्हा शिवसैनिकांची मजल गेल्याने काही काळ गेल्यावर पद बदलून पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्याचे मानले जाते. पालिका निवडणुकीत डोंबिवलीत शिवसेनेला फटका बसला. स्वत: चौधरी हेही निवडणुकीत हरले होते. शहरप्रमुखपदावर चौधरी यांना चार वर्षे झाली होती. त्या काळात पक्षाला बळकटी मिळाली नसल्याचा मुद्दा शिंदे यांच्यापर्यंत पोचवण्यात आला होता. डोंबिवली स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात भाऊंनी पक्षाचेच महापौर राजेंद्र देवळेकर यांना पत्र दिले होते. त्याचीही पक्षाने दखल घेतली आणि पद बदलण्याची कारवाई करण्यात आली.>‘रासरंग दांडिया’च्या यशाचे बक्षीस मिळाल्याची चर्चाखासदार श्रीकांत शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या रासरंग दांडियात गुजराती समाजाला सहभागी करून घेण्यात मोरे यांनी पुढाकार घेतला होता. राज्यमंत्री, भाजपाचे स्थानिक पातळीवरील भरभक्कम नेते रवींद्र चव्हाण यांच्या ‘नमो दांडिया’ उत्सवाला टक्कर देण्यासाठी या दांडियाचा शिवसेनेला उपयोग झाला. शिवसेनेत येण्याआधी मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. कल्याण उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे यांचे ते हे खंदे समर्थक आहेत. १९९७ मध्ये ते शिवसेनेत आले. त्यांनी पोटनिवडणूक लढवली. शिवसेनेतर्फे नगरसेवक झाले. यंदा भाजपची लाट असतांनाही संगीतावाडीत काँटे की टक्कर देत मोरे यांनी ८८ मतांनी विजय मिळवला होता.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना