शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची १०१ शाखा निहाय घरगुती श्री गणपती सजावट स्पर्धा; तब्बल ११ लाखांची बक्षिसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2023 12:47 IST

शिवसेना पक्षाचे १०१ शाखा प्रमुख असून प्रत्येक शाखेच्या कार्यक्षेत्रात ही स्पर्धा होणार आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये शिवसेना आणि आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन मार्फत १०१ शिवसेना शाखा निहाय घरगुती श्री गणपती सजावट दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून तब्बल ११ लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. इतक्या मोठ्या स्वरूपातील शहरातील हि पहिलीच गणपती सजावट स्पर्धा आहे. 

शिवसेना पक्षाचे १०१ शाखा प्रमुख असून प्रत्येक शाखेच्या कार्यक्षेत्रात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत नाव नोंदणी जवळच्या शिवसेना शाखेत, शाखा प्रमुखा कडे तसेच सरनाईक यांच्या मंगल नगर येथील जन संपर्क कार्यालयात करता येणार आहे . ही स्पर्धा फक्त मीरा भाईंदर शहरातील भक्तांसाठी आहे. शाखा क्षेत्र निहाय विजेत्यांना पहिले बक्षीस ५ हजार रोख, दुसरे ३ हजार रोख, तिसरे २ हजार रोख व उत्तेजनार्थ १ हजार रोख सह सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. पर्यावरणस्नेही वस्तूंपासून केलेल्या सजावटीला तसेच इको फ्रेंडली मूर्ती किंवा आकर्षक मूर्ती असल्यास त्यांची विशेष नोंद घेतली जाणार आहे. 

स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे.  स्पर्धकांनी काढलेले फोटो हे शाखेमध्ये स्वीकारले जाणार नाहीत. शाखा प्रमुख व त्याचे सहकारी नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या घरी जाऊन सजावटी चे परीक्षण करतील आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. घरगुती गणेश सजावटीसाठी मेहनत घेऊन चांगले देखावे साकार करणाऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा  आ. सरनाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली आहे . त्यात सर्व भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर आणि विक्रमप्रताप सिंह यांनी केले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईक