शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

शिवसैनिकांनीच केली नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड;बदलापुरात शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 00:16 IST

गुन्हा दाखल : आरोपींमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रेंचाही समावेश,

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या आधी पालिकेत शिवसेनेचे नगरसेवक आणि पक्षाचे शहरप्रमुख यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. या वादाचे पडसाद पालिकेची सभा संपल्यावर उमटले. शहरप्रमुखांसोबत वाद घातल्याचा राग मनात धरून काही शिवसैनिकांनी नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे हे बुधवारी सर्वसाधारण सभेसाठी पालिकेत आले होते. यावेळी शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुकाराम म्हात्रे हेदेखील कार्यालयात होते. वडनेरे हे पालिकेत आल्यावर म्हात्रे यांच्यासोबत वादावादी झाली. यावेळी नगरसेवकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले. मात्र, या प्रकाराची माहिती मिळताच पालिका कार्यालयासमोर शिवसैनिकांची गर्दी झाली होती.

या घटनेमुळे पालिकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते पालिकेसमोर जमल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पालिकेबाहेरून हुसकावून लावले. मात्र, सभा संपल्यावर काही शिवसैनिकांनी वडनेरे यांच्या कार्यालयावर हल्ला केला. तीन ते चार गाड्या भरून कार्यकर्ते आले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून पोबारा केला. हा प्रकार घडला, त्यावेळी नगरसेवक वडनेरे हे शेजारीच गणेश मंडळाच्या मंडपात आरती करत होते. हा प्रकार अचानक घडल्याने त्यांना बचाव करता आला नाही. मात्र, हा प्रकार म्हात्रे यांच्या आदेशाने झाल्याचा आरोप वडनेरे यांनी केला आहे.

वडनेरे आणि म्हात्रे यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद होता. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वडनेरे हे उमेदवारीच्या आशेवर प्रचार करत होते. त्यामुळे वडनेरे हे गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीत होते. मात्र, ज्या पक्षातून ते इच्छुक होते, त्या पक्षाच्या शहराध्यक्षांबरोबरच त्यांचे पटत नसल्याने बदलापुरात वडनेरे यांनी स्वत:चा गट तयार करून काम सुरू केले होते. त्यातच म्हात्रे आणि वडनेरे यांचा वाद वाढल्याने त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले.नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यावर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वातावरण चिघळणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांना ताब्यात घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल. - विनायक नराळे, सहायक पोलीस आयुक्तपालिकेत वाद झाल्यावर त्या ठिकाणी न थांबता मी माझ्या कार्यालयात आलो. बाजूलाच गणेश मंडळाच्या मंडपात आरती करत असताना, जमावाने हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली आहे. या हल्ल्यात नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांचा हात आहे. - शैलेश वडनेरे, नगरसेवकसंतप्त शिवसैनिकांनी हा हल्ला केला आहे. मात्र, त्यामागे काही कारणे असतील. वडनेरे हे गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादीच्या जवळ होते. त्यामुळे त्यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये संताप होता. त्यातून हा प्रकार घडला आहे. त्यात प्रत्यक्ष माझा सहभाग नव्हता. - वामन म्हात्रे, शहराध्यक्ष, शिवसेना, बदलापूरशैलेश वडनेरे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्लाप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये नगरसेवक तुकाराम म्हात्रे, केशव म्हात्रे, रोहिदास भंडारी, भावेश म्हात्रे, बंडू म्हात्रे, प्रसाद परब, बंटी म्हसकर, कांत्या, व इतर ७ ते ८ जणांचा समावेश आहे. वामन म्हात्रे यांनी हल्ल्यासाठी चिथावणी दिल्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना