शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकाकडूनच तिलांजली; लग्नसोहळ्यात तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 06:56 IST

वर-वधुपित्यांसह इतरांवर गुन्हे दाखल

कल्याण : कोरोना नियम पाळण्याच्या आवाहनाला शिवसेनेच्या माजी नगरसेवकानेच तिलांजली दिल्याचे चित्र शनिवारी कल्याणमध्ये पाहायला मिळाले. ५० जणांच्याच उपस्थितीला परवानगी असताना माजी नगरसेवक सुनील वायले आणि माजी नगरसेविका शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला तोबा गर्दी झाली होती. या ठिकाणी दोन लग्नसोहळे होते. यात नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान, याप्रकरणी वधुपिता वायले यांच्यासह अन्य लग्नसोहळ्यातील वधुपिता सुरेश म्हात्रे आणि भवानी मॅरेज हॉलचे व्यवस्थापक रमेश सिंग यांच्यावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन नियमांचे पालन करण्यास नागरिकांना सांगत आहेत. मात्र नियम पाळले जात नसल्यामुळे स्थिती भयावह हाेत आहे. अशातच नगरसेवकही नियमांना तिलांजली देत असून शनिवारच्या लग्नसोहळ्यातून हे समोर आले आहे. यातील एक लग्नसोहळा माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीचा होता. याप्रकरणी त्यांच्यासह तेथे पार पडलेल्या अन्य लग्नसोहळ्यातील वधुपिता सुरेश म्हात्रे आणि हॉलचे व्यवस्थापक रमेश सिंग अशा तिघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ना मास्क, ना डिस्टन्सिंगपश्चिमेतील काळा (भगवा) तलाव परिसरात पार पडलेल्या दोन लग्नसोहळ्यांना १०००च्या आसपास पाहुण्यांनी उपस्थिती लावल्याचे पोलिसांना आढळले. यात बहुतांश जणांनी मास्कही परिधान केले नव्हते की सोशल डिस्टन्सिंगही नव्हते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना