शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

थीम पार्कच्या प्रकरणावरुन शिवसेनेने केली पालिका प्रशासनाची पाठराखण, ठेकेदारावर मात्र साधला निशाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 15:14 IST

मागील काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपा थीम पार्कच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. परंतु आता या कामात ठेकेदाराच जबाबदार असून पालिका प्रशासनातील अधिकारी निर्दोष असल्याचा एक प्रकारे निर्वाळाच सत्ताधारी शिवसेनेने दिला आहे.

ठळक मुद्देसव्वा दोन कोटीत केळकरांनी काम करुन दाखवावेसरनाईकांचा भाजपावर पलटवार

ठाणे - घोडबंदर भागातील थीम पार्कमध्ये ८२ टक्यांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला असतांनाच आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हे काम जर सव्वा दोन कोटीत केळकर करणार असतील तर त्यांनी ते करुन दाखवावे असे थेट आव्हान दिले आहे. परंतु हे आव्हान देत असतांनाच त्यांनी पालिका प्रशासनाची पाठराखण करीत कृष्णकृत्य करणाऱ्या त्या ठेकेदारावर निश्चितच कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.                              सोमवारी आमदार केळकर यांनी थीम पार्कचा पाहणी दौरा केल्यानंतर या कामात ८२ टक्यांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत शिवसेनेवर टिकास्त्र सोडले होते. त्यानंतर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी भाजपावर पटलावर केला होता. आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे सुध्दा मैदानात उतरले असून त्यांनी सुध्दा या प्रकरणात भाजपालाच टारगेट केले आहे. बुधवारी सरनाईक यांनी सकाळीच या थीम पार्कचा पाहणी दौरा केला. या प्रकरणात भाजपा केवळ राजकीय पोळी भाजत असून, आता राजकारण खुप झाले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही आमची सुध्दा मागणी आहे. त्या ठेकेदावर कारवाई व्हावी, मग ती कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून करा किंवा अन्य कोणाकडूनही करा परंतु कारवाई व्हावी ही आमची सुध्दा इच्छा आहे. परंतु ज्या वेळेस हा ठराव स्थायी समितीत मंजुर झाला त्या वेळेस भाजपाचाच सभापती होता, मग त्यांनी याला त्यावेळेसच विरोध का केला नाही असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.तसेच या प्रकरणात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विविध प्रकल्पांची मागणी करीत असतो, प्रशासन त्यानुसार काम करीत असते. त्यामुळे प्रशासनाचा यात काही दोष आहे, असे म्हणने चुकीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकप्रकारे त्यांनी या प्रकरणात प्रशासनाला जवळ जवळ क्लिनचीटच दिल्याचे दिसून आले. ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे, त्याच्यावर योग्य ती चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच राष्टÑ पुरषांच्या पुतळ्यांची निगा देखभाल महापालिकेने राखावी असे आवाहन करतांनाच त्यांना ते जमत नसल्यास त्यांनी उद्यानांमध्ये राष्टÑ पुरुषांचे पुतळे उभारु नये असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी हे दोघेही अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता या दोघांनीही एकमेकांना सावरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सेनेचे नेते आणि प्रशासकीय अधिकाºयांमध्ये एक तातडीची महत्वाची बैठक झाली. त्यात एकमेकांना सावरण्यासाठी एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार शिवसेनेची मंडळी आता पुढे येऊ लागली असून पत्रकार परिषद आणि पाहणी दौरा आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आमदार सरनाईक यांनी केळकर यांना आव्हान दिल्यानंतर भाजपाचे गटनेते नारायण पवार आणि मिंिलद पाटणकर यांनी हे आव्हान स्विकारले असून आम्ही सव्वा दोनकोटीमध्ये काम करुन दाखवितो. परंतु ते काम केले तर सरनाईक यांनी या थीम पार्कसाठी झालेला 16 कोटींचा खर्च पालिकेला द्यावा असे आव्हान दिले आहे.  

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिन