शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे कोणाबरोबर बर्फात खेळले, नरेश म्हस्के यांचा सवाल

By अजित मांडके | Updated: January 16, 2024 16:14 IST

दावोस दौऱ्यावरुन टीका केली जात असतांना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आता पलटवार केला आहे.

ठाणे :  दावोस दौऱ्यावरुन टीका केली जात असतांना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आता पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांची प्रकृत्ती खालावली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. परंतु अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्या सोबत असणे आवश्यक असतांना ते दावोसला काय करत होते, दौरा संपल्यानंतरही ते कोणाबरोबर बर्फात मौज मजा करीत होते, हे त्यांनी जाहीर करावे असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या डावोस दौऱ्यावर आहेत. परंतु या दौऱ्यावरुन उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका केली जात आहे. त्या टिकेला म्हस्के यांनी उत्तर दिले आहे. वास्तविक त्यावेळेस दावोस दौऱ्याला उद्योगमंत्र्यांनी जाणे आवश्यक असतांना पर्यटनमंत्री का गेले असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे आदू बाळ खरच आदू असून त्यांचा स्मृती भ्रंष झाल्याचेही ते म्हणाले. लहानपणी खाऊसाठी भांडायचे तसे तेव्हा मुख्यमंत्र्याचे मागे लागून दाओसला गेले होते, अशी टिकाही त्यांनी केली. त्यातही या दौऱ्याला किती जणांना ते घेऊन गेले होते, ते देखील जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. नियमानुसार आम्ही उच्च न्यायालयात गेला असून उबाठा गटातील १४ आमदारांना अपात्र करावे अशी मागणी केली आहे. अध्यक्षांवर दबाव होता, म्हणून त्यांनी १४ आमदारांना अपात्र केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अध्यक्षांना कोणी भिती दाखवली म्हणून त्यांनी तो निर्णय दिला का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.ठाण्यातील सर्व आमदार खासदारांना महाआरतीचे निमंत्रण दिले जाणार आहे. राम मंदिराचे श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे, हे खासदार राजन विचारे आणि त्यांच्या नेत्यांनी मान्य करावे आम्ही त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देऊ असेही ते म्हणाले. मात्र जितेंद्र आव्हाड यांना निमंत्रण दिले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आपल्याकडील लोक थाबंवावी यासाठीच महापत्रकार परिषद घेतली गेल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच आपले अस्तित्व दाखविण्यासाठीचा हा केवीलवाणा प्रयत्न असल्याचेही टिकाही त्यांनी केली. ज्यावेळेस पत्रकारांशी बोलायला हवे ते तेव्हा मी आणि माझे कुटुंब आणि लॅपटॉप यातून ते कधीच बाहेर पडल्याचेही ते म्हणाले.शिल्लक सेना संपणारयेत्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्याकडील आमदार, खासदार आणि महत्वाचे पदाधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही म्हस्के यांनी केला आहे.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे