शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ३२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

Mira Road: ठाकरे गटाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची शिवसेना शिंदे गटाची मनपा आयुक्तांकडे मागणी 

By धीरज परब | Updated: November 21, 2023 18:54 IST

Mira Road: शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनर शाखां विरुद्ध तक्रारी करत कारवाईची मागणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख मंडळींच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी आता शिंदे गटाने आयुक्तांना भेटून लेखी पत्राद्वारे केली आहे . त्यामुळे दोन्ही गटातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. 

मीरारोड - शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनर शाखां विरुद्ध तक्रारी करत कारवाईची मागणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख मंडळींच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी आता शिंदे गटाने आयुक्तांना भेटून लेखी पत्राद्वारे केली आहे . त्यामुळे दोन्ही गटातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भाईंदर पूर्व व मीरारोड भागात कंटेनर ठेऊन शिवसेना शाखांचे उदघाटन करण्यात आले आहे . तर सार्वजनिक रस्ता , पदपथ ठिकाणी अनधिकृतपणे कंटेनर ठेऊन ह्या शाखा सुरु केल्याने त्यावर कारवाई करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटासह मनसे , काँग्रेस , भाजपाने केली . सोमवारी ठाकरे गट , मनसे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे मोठ्या संख्येने जमून महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन कंटेनर शाखांवर कारवाईची मागणी केली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर व महिला संघटक निशा नार्वेकर सह विक्रम प्रताप सिंह , राजू वेतोस्कर , पूजा आमगावकर , सचिन मांजरेकर , कमलेश भोईर , विकास पाटील आदींनी महापालिकेत आयुक्तांची भेट घेतली . यावेळी आयुक्तांना लेखी पत्र देऊन त्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नावे न टाकता त्यांच्या बांधकामांची तक्रार केली गेली . 

पेणकरपाडा येथे दालमिया शाळेसमोरील महानगरपालिकेच्या आरक्षित भुखंडावरती सर्व्हिस सेंटर , गॅरेज , हॉटेल , गाळे आदी अनधिकृत बांधकामे.  तुंगा रुग्णालय जवळ हॉली कॉम्प्लेक्स  इमारतीच्या पहिल्या माळ्यावर गच्ची वर अनधिकृत बांधकाम व लोखंडी जीना.  नवघर गाव, इंद्रप्रस्थ डी येथील जनसंपर्क कार्यालया समोरील वाढीव शेड बांधकाम.  रामदेव पार्क शेजारील जागेत काजल ग्राउंड येथे अनधिकृत बांधकाम करून विनापरवाना विविध कार्यक्रमासाठी जागा भाडेतत्वावर देणे .  प्रभाग क्र. १६, सृष्टी येथील कोस्टल हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत अनधिकृत बाईक शोरूम. नवघर, सरस्वती नगर येथील सचिन तेंडुलकर मैदानाच्या शेजारी कार पार्किंग करण्याकरिता स्थानिक नागरिकांकडून अनधिकृतपणे वसुली करून नागरिकांना वेठीस धरणा-यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे . हि सर्व बांधकामे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संबंधित आहेत . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडShiv Senaशिवसेना