शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बाळ्यामामांना बंडखोरी भोवली, शिवसेनेने घेतला पदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:33 IST

कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रसंगी सहकार्य न केल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांंच्यावर सेनेने कडक कारवाई केली.

- सुरेश लोखंडे ठाणे : भाजप - शिवसेना युतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रसंगी सहकार्य न केल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांंच्यावर सेनेने कडक कारवाई केली. त्यांच्या संपर्कप्रमुखपदासह ठाणे जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाचादेखील तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला. सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी त्यांनी हा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत महिला बालकल्याण समितीच्या दर्शना ठाकूर यांनीदेखील सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे.जिल्हा परिषदेत सभापती असूनही शिवसेनेचे म्हात्रे यांनी युतीचे उमेदवार पाटील यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. एवढेच नव्हे तर या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी युतीचा प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाच्या तिकिटासाठीदेखील सर्वतोपरी प्रयत्न केले. यावेळी त्यांनी पक्ष आदेश (व्हीप) विचारात न घेता युतीचे उमेदवार पाटील यांच्या विरोधात भिवंडी लोकसभा मतदारसंघात रान उठवले. त्यांची गंभीर दखल घेऊन शिवसेनेने निवडणूक काळातच त्यांच्याकडील संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी काढून घेतली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच त्यांच्याकडील जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतीपदाचा राजीनामा देण्याचे पक्षाचे आदेश त्यांना मिळाले.जिल्हा परिषद सभापतीपदाच्या सर्व प्रकारच्या बैठकानाही त्यांना उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळेच स्थायी समितीच्या दोन बैठकादेखील झालेल्या नाहीत, असे एका वरिष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले. त्यांचा केवळ सभापतीपदाचा राजीनामा घेतलेला असून जिल्हा परिषदेचे सदस्य राहणार असल्याचेही निदर्शनात आणून देण्यात आले आहे. पक्ष आदेशाचे पालन करून म्हात्रे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा दिला. तर ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याचे कारण पुढे करून महिला व बालकल्याण समितीच्या दर्शना ठाकरे यांनीदेखील त्यांच्या सभापतीपदाचा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्यांनी हे दोन्ही राजीनामे मंजूर करून मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.>राष्ट्रवादी सत्तेतून होणार हद्दपारआता लवकरच ठाणे जिल्हा परिषदेतील शिवसेना-राष्टÑवादी काँगेस पक्षाची सत्ता बदल होण्याचे वारे वाहत असल्यामुळे या संपूर्ण बॉडीलाच सत्तेवरून पायउतार करण्याच्या राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा परिषदेतील सत्तेचे खांदेपालट होणार आहे. शिवसेना जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या सत्ता बदलात राष्टÑवादीचे सुभाष पवार यांचे उपाध्यक्षपद अडीच वर्षांपर्यंत कायम ठेवणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.>उज्ज्वला गुळवी, निखिल बरोरा यांचीही होणार गच्छंतीपक्षश्रेष्ठींनी ठरवून दिल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे आता अन्यही सभापतींना पदांचा राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे राष्टÑवादीच्या उज्ज्वला गुळवी यांनाही कृषी व पशूसंवर्धन समिती सभापतींचा व समाजकल्याण समती सभापती निखिल बरोरा यांनादेखील सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे राष्टÑवादीचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे