शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोना लसीकरण मोहिमेत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 12:20 IST

Shrikant Eknath Shinde : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील वर्ष २०२१-२२ साठीच्या अनुदान मागणीकरिता आयोजित चर्चेमध्ये सहभाग घेत विविध मुद्द्यांवर श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले.

ठळक मुद्देकेंद्रातील सरकार महाराष्ट्र राज्य सरकारशी दुजाभाव करत असल्याचे मत सभागृहात मांडले.

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने कोरोना विरोधी लढ्यात केलेल्या कडक उपाय योजना आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध केलेल्या जम्बो आरोग्य सुविधांबद्दल जागतिक आरोग्य यंत्रणा तसेच वॉशिंगटन पोस्टने राज्य सरकारचे कौतुक केले, परंतु केंद्र सरकारकडून मात्र दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. (Shiv Sena MP Dr Shrikant Eknath Shinde allegation on Central government for Corona vaccination campaign)

बुधवारी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील वर्ष २०२१-२२ साठीच्या अनुदान मागणीकरिता आयोजित चर्चेमध्ये सहभाग घेत विविध मुद्द्यांवर श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले. यावेळी केंद्रातील सरकार महाराष्ट्र राज्य सरकारशी दुजाभाव करत असल्याचे मत सभागृहात मांडले.

श्रीकांत शिंदेंनी सभागृहात मांडलेले मुद्दे...

१) केंद्रीय आरोग्य बजेटमध्ये १३७ टक्के वाढ न करता याउलट रु. ६००० ने कमी करत ७१,००० कोटी केले.

२) महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना या वैश्विक महामारीशी लढताना टेस्टिंगवर भर देत जास्तीत जास्त टेस्टिंग केले, कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढवणे, कमीत कमी वेळेत जम्बो आरोग्य सुविधा उपलब्ध केल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर उपचार करता आले, याची जागतिक आरोग्य यंत्रणा तसेच वॉशिंगटन पोस्ट ने दखल घेत राज्य सरकारची कौतुकाने पाठ थोपटली.

३) महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९१ टक्के पेक्षा जास्त असून आतापर्यंत १ करोड टेस्ट केल्या आहेत. लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्यात ३३ टक्क्यांहून अधिक नागरिकांना लसीचे डोस मिळाले आहे जे उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांपेक्षा ही खुपच अधिक आहेत.

४) चर्चेदरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारने लसीकरणासंबंधीत केंद्राकडे केलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकार कडे २.२० करोड लशींच्या डोसची मागणी केली आहे, ज्यामुळे दरदिवशी सुमारे ५ लाख राज्यातील नागरिकांचे लसीकरण केले जाऊ शकते जेणेकरुन राज्यातील कोरोनाचे वाढते संक्रमणावर आळा बसेल. परंतु केंद्र सरकार कडून महाराष्ट्र सरकारला आतापर्यंत ६९ लाख डोस दिले असून अजून राज्यात २.८४ करोड डोसची गरज असून ती लवकरात लवकर पूर्ण करावी, ही मागणी करत सभागृहाचे लक्ष वेधले.

५) तसेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यात ३७६ कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली असताना २०९ लसीकरण केंद्रांना केंद्र सरकारने मंजुरी दिली असून उर्वरित १५८ लसीकरण केंद्रांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजूरी द्यावी, जेणेकरुन सद्यस्थितीत कोरोनाचे वाढत असलेले संक्रमण रोखण्याकरिता राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवत मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवता येईल, अशी मागणी देखील यावेळी केली.

६) १ लाख २०हजार कोटी बजेटची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलली असताना त्यापेक्षा खुप कमी रु.५०,००० कोटी इतका निधी मंजूर केला गेला आहे की जे  देशाच्या जीडीपीच्या फक्त १.८ टक्के आहे की जे आपल्या शेजारील श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान सारख्या छोट्या देशांच्या तुलनेने हे प्रमाण खुपच कमी आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी देशाच्या आरोग्य सक्षमीकरणाला अधिक प्राधान्य देणे अतिशय गरजेचे असल्याचे मत यावेळी मांडले. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेCorona vaccineकोरोनाची लस