शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शिवसेना नेत्यांचा आपापल्या हंड्यांचा टेंभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:23 IST

शहरातील टेंभीनाका येथील दहीहंडीचे महत्त्व वाढवण्याकरिता एकच हंडी बांधा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली सूचना उच्च न्यायालयाच्या निर्बंध शिथिल करण्याच्या

ठाणे : शहरातील टेंभीनाका येथील दहीहंडीचे महत्त्व वाढवण्याकरिता एकच हंडी बांधा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली सूचना उच्च न्यायालयाच्या निर्बंध शिथिल करण्याच्या आदेशानंतर चक्क दुर्लक्षित करून चार नेत्यांच्या चार दहीहंड्या उभारण्याचा निर्णय झाला आहे.न्यायालयाच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून ठाण्यातील दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले होते. त्यामुळे ठाण्यात एकच मानाची हंडी उभारण्याची सूचना ठाकरे यांनी केली. फिफा अंडर सेव्हन्टीन वर्ल्ड कपचा माहोल याच एका दहीहंडीच्या ठिकाणी तयार करावा, असे ठाकरे यांचे मत होते. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहीहंडी स्व. आनंद दिघे यांनी सुुरू केली होती. तीच एकमेव मानाची दहीहंडी असावी, असे ठाकरे यांचे म्हणणे होते.ठाण्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि उत्सवाची एक परंपरा आहे. ठाण्यातील गणेशोत्सव म्हटले की, काही मोजक्याच गणेश मंडळांची नावे समोर येतात. नवरात्र आणि दहीहंडी उत्सव म्हटले की, टेंभीनाक्याचेच नाव कुणाच्याही डोळ्यांसमोर येते. टेंभीनाक्यावरील दिघे यांची हंडी मानाची म्हणून ओळखली जाते. दिघे होते, तोपर्यंत ठाण्यात एकच मानाची हंडी उभारली जात होती. त्या ठिकाणी समस्त शिवसैनिकांची गर्दी होत होती. परंतु, त्यांच्या निधनानंतर टेंभीनाक्याच्या एका हंडीच्या चार हंड्या झाल्या. टेंभीनाक्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरील जांभळीनाक्यावर खासदार राजन विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने दहीहंडी उत्सव सुरू केला. आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांनी दहीहंडी उत्सवाला एक वेगळा लौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांत हंड्या उभारून मतांची बेगमी करण्याचा मार्ग प्रशस्त केला. हळूहळू सेलिबे्रटींचा वावर, मीडिया हाइप करून व उंची-बक्षिसांची स्पर्धा यामुळे या उत्सवाला कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त करून देण्यातही त्यांचा वाटा आहे.दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीच्या उंचीवर न्यायालयाने मर्यादा घातल्यानंतर दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले. गोविंदा पथकांची संख्यादेखील कमी झाली. न्यायालयाचा निकाल प्रलंबित असल्याने अनेक गोविंदा मंडळांनी थरांचा सराव सुरू केला नव्हता. ठाण्यातील शिवसेनेचेही न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. ठाण्यात चार दहीहंड्यांऐवजी टेंभीनाक्यावर एकच हंडी उभारावी, असा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन आमदार आणि एक खासदार यांची बैठक होऊन एकमताने घेण्यात आला, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.हंड्यांची संख्या वाढावी, हीच दिघेंची इच्छान्यायालयाचा निर्णय आला आणि निर्बंध शिथील झाल्याने एका दहीहंडीच्या निर्णयाला बाजूला सारून पुन्हा चार दहीहंड्या लावण्याचे ठरले. यासंदर्भात ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना विचारले असता, असा कोणताच निर्णय झाला नव्हता. उलटपक्षी स्व. आनंद दिघे यांची शहरातील दहीहंड्यांची संख्या वाढावी, अशी भूमिका होती, असे शिंदे म्हणाले.