शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केला अपमान; विचारेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

By अजित मांडके | Updated: August 26, 2022 19:23 IST

धर्मवीर आनंद दीघे यांच्या पुण्यतिथी निमित्त विचारे यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

अजित मांडके ठाणे : ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु आहे. त्यात काही दिवसांपूर्वी धर्मवीर आनंद दीघे यांनी खासदार राजन विचारे यांनी लिहीलेले पत्र चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आता दीघे यांच्या पुण्यतिथी निमित्त विचारे यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे गटावर बोचरी टीका केल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाण्यात आता शिंदे विरुद्ध विचारे असा सामना रंगणार असल्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत. 'जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरा. ज्यांना घडवले तुम्ही त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला,' असा संदेश व्हिडीओद्वारे देत विचारे यांनी पुन्हा शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचेच दिसत आहे.

दीड महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे, फडणवीस सरकार राज्यात आले. मात्र येथूनच शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्यास सुरवात झाली आहे. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले. मात्र काहींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. यात ठाण्याचे शिवसेनेचे खासदार विचारे यांचाही समावेश होता. सुरुवातीला त्यांनी या वादात न पडण्याचाच निर्णय घेतला होता. मात्र आता ते देखील उघड उघडपणे शिंदे गटावर टीका करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना लिहलेले पत्र चांगलेच वायरल झाले होते. त्यानंतर आता नवीन व्हिडीओमुळे देखील सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.आमचा आनंद हरपला असा उल्लेख करत दीघे यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. तसेच शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘बाळासाहेब म्हणजे तुमचे कुलदैवत. अंतिम त्यांचा शब्द. तोच ङोलत तुम्ही ठाण्यात भगवा कायम ठेवला. तुम्ही सामान्य शिवसैनिक पेटवला. हिंदुत्वाचा ज्वालामुखी तो तुम्ही जागवला. आमचे सर्वांचे गुरु वर्य तुम्ही. निष्ठेचे दैवत तुम्ही. तुम्ही आम्हापासून दूर गेलात आणि तुटला आम्हाला एकसंघ ठेवणारा दोरा. आमचा आज आनंदच हरपला. गद्दारांना क्षमा नाही म्हणून तुम्ही गरजला. रुद्र अवतार पाहून तुमचा अख्खा महाराष्ट्र हादरला. कसलीच चूक नसताना टाडामध्ये तुरुंगात असताना मागितली असती माफी तर तुम्ही सुटलाही असता. पण निष्ठेच्या दरवाजाजवळ कुठलीच माघार नसते. कुठलेच व्यवहार आणि लोभ नसतात. असते ती केवळ निष्ठा, आत्मसन्मान, समाजाचा उत्कर्ष आणि संघटना. पण जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी. गुरु वर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरा. ज्यांना घडवले तुम्ही त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला,’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे गटावर टीका केली.

‘तुमचा प्रवास पाहायला  गुरु वर्य (आनंद दीघे) आम्ही, याची देही याची डोळा. श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत ही तुम्ही धरली फक्त आणि फक्त सत्याची कास. अखंड शिवसेनेबद्दलची आस. त्याला आघात निष्ठेची साथ. तुम्ही म्हणजे अस्सल मातीतला माणसांसाठी लढणारा माणूस खरा. तुम्ही गेलात आणि शिवसैनिकांत पाझराला अश्रूंचा झरा व आज आमचा आनंदच हरपला’ असे विचारे यांनी चित्निफतीत म्हटले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे