शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आता शिवसैनिक नाही तर नमो सैनिक; शिवसेनेने दिला नारा

By अजित मांडके | Updated: February 5, 2024 18:46 IST

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी नमोचा नारा दिला आहे

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर हा शिवसेनेचा, तो भाजपचा तो राष्ट्रवादीचा असा भेदाभेद न करता प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या शब्द खरा करण्यासाठी नमो सैनिक म्हणून काम करावे असा नारा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिला आहे. परंतु त्यांच्या या विधानावरुन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी निशाना साधत याचसाठी केला होता का? अट्टाहास असा असे ट्विट करत टोला लगावला आहे.

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी नमोचा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये आजही शिवसेना आणि भाजपमध्ये उमदेवारी वरुन तुतु मै मै सुरु आहे. ठाणे लोकसभेवर शिवसेना आणि भाजप या दोघांनीही दावा केला आहे. त्यांच्याकडून इच्छुकांनी त्याची पेरणीसुध्दा केली आहे. परंतु ठाणे लोकसभा कोणाकडे जाणार हे अद्यापही निश्चित नाही. त्यात कल्याणमध्येही शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील कुरबुऱ्या सुरु आहेत. त्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात का होईना वितुष्ट निर्माण झाले असून कुरघोडीचे काम सुरु आहे. त्यामुळे महायुतीवर टिका देखील होत आहे. याच संदर्भात म्हस्के यांना छडेले असता, महायुतीच्या माध्यमातून योग्य प्रकारे कामे सुरु आहेत, परंतु काही वेळेस वैयक्तिक पातळीवर काही प्रकार घडत असतात. परंतु त्याचा परिणाम महायुतीवर कुठेही झालेला नाही. या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून ४८ जागा निवडून देण्याचा शब्द दिला आहे. आता त्यांनी दिलेला शब्द हा महायुतीमधील प्रत्येक पक्षातील पदाधिकाºयाला लागू आहे. त्यामुळे हा शिवसेनेचा, हा भाजपचा तो राष्ट्रवादीचा असे काम न करता यापुढे नमो सैनिक म्हणूनच काम करायचे आहे, असा नाराच म्हस्के यांनी या निमित्ताने दिला आहे.

परंतु त्यांनी दिलेल्या या नाऱ्याचे ट्विट करत उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी म्हस्के यांच्यावर निशाना साधला आहे. याच साठी केला होता अट्टाहास... शिंदेची सेना ही शिवसेना नसून आजपासून नमो सेना आणि नमो सैनिक झाले आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे आहोत असा उठाठेव करणारे आता कोणत्या बिळात लपले आहेत, शेवटी म्हस्केंच्या ओठातले बाहेर पडले, नमो सैनिक झाले आणि यांचा अखेर पडदा उठला अशी टिका त्यांनी केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी