शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

शिवसेनेची युतीसाठी भाजपाला टाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:15 IST

भार्इंदर पालिका : स्थायी समितीत अर्थसंकल्प मंजूर

मीरा रोड : लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा व शिवसेनेची युती झाली असताना राज्यात एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेतही सत्ताधारी भाजपाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देत शिवसेनेने युतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची कामे रोखण्यापासून थेट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे काम व घोडबंदर किल्ल्याच्या कामाचे भूमिपूजन रखडवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला गेला. भाजपा व सेनेच्या आमदारांनी तर एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत व्यक्तिगत उणीदुणी काढली. सेनेनेही भाजपाच्या कारभारावर सातत्याने टीकेची झोड उठवत विरोध केला. पण, राज्यात भाजपा व सेनेची युती झाल्यानंतर आता शिवसेनेने महापालिकेतही युतीसाठी हात पुढे केला आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत आला.

स्थायी समितीमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा झाल्यानंतर भाजपाचे हसमुख गेहलोत यांनी मुख्य अंदाजपत्रक मंजुरीचा ठराव मांडला. त्याला शिवसेनेच्या दीप्ती भट यांनी अनुमोदन दिले. अग्निशमन विभागाच्या अर्थसंकल्प मंजुरीचा ठराव भाजपाचे राकेश शाह यांनी मांडला असता त्याला सेनेच्या वंदना पाटील यांनी पाठिंबा दिला. तर, परिवहन उपक्रमाच्या अंदाजपत्रक मंजुरीचा ठराव भाजपाच्या वर्षा भानुशाली यांनी मांडला असता शिवसेनेच्या अनिता पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले.भाजपाने मांडलेल्या तीनही ठरावांना सेनेच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिल्याने भाजपाच्या नगरसेवकांनी आनंद व्यक्त करत स्वागत केले. काँग्रेसच्या जुबेर इनामदार व राजीव मेहरा यांनी मात्र प्रत्येक अर्थसंकल्पाच्या विरोधात ठराव मांडला. परंतु, भाजपाचे नऊ व सेनेचे चार नगरसेवक मिळून युतीचे संख्याबळ १३ झाले. तर, काँग्रेसचे फक्त दोनच नगरसेवक असल्याने युतीचा ठराव बहुमताने मंजूर झाला.आमदार नरेंद्र मेहतांच्या निकटवर्तीय नगरसेवकाने तर शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आमच्याकडे बहुमत असल्याने आम्हाला युतीची गरज नाही व नव्हती आणि युती करण्याबाबत स्थानिक वा पक्ष नेतृत्वाकडूनही आदेश नसल्याचे त्या नगरसेवकाने स्पष्ट केले.सेनेशिवाय काँग्रेस विरोधक म्हणून ठाम उभीप्रशासनाने अंदाजित केलेल्या उत्पन्नापेक्षाही कमी वसुली होत असताना केवळ अर्थसंकल्प फुगविण्याचे काम सत्ताधाºयांकडून केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवसेनेशिवायही काँग्रेस विरोधकांची भूमिका ठामपणे वठवू शकते असे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. यापुढे पालिकेत सेना काँग्रेससोबत कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खास करून महासभेच्यावेळी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. पालिकेत युतीबाबत कोणती चर्चा वा निर्देश नव्हते. पण, शिवसेनेने पाठिंबा दिल्याने आनंदच झाला आहे. सेनेने विकासकार्यास पाठिंबा देऊन आमच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. एकत्र मिळून चांगली कामे करू. पण, युतीचा निर्णय आमचे आमदार नरेंद्र मेहता घेतील.- रवी व्यास,सभापती, स्थायी समितीविकासाला आणि कायदेशीर प्रस्तावांना शिवसेनेचा पाठिंबा नेहमीच राहिला आहे आणि यापुढेही तो भाजपाला असेल. त्या अनुषंगानेच जे योग्य व जनहिताचे प्रस्ताव आहेत, त्याला पाठिंबा दिला आहे.- हरिश्चंद्र आमगावकर,गटनेते, शिवसेना

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर