शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेनं दिली भाजपाला साथ, आगामी सेना-भाजपा युतीचे मिळाले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 04:12 IST

भाजपाच्या मंडळींनी आपल्या दोन उमेदवारांना अतिरिक्त मते वाटल्याने तिसरा उमेदवार धापा टाकत ९६ मतांवर अडकला. मनसेच्या उमेदवारालाही तेवढीच मते पडली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराला दिलेला हात भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता अपेक्षित होता. भाजपाचे दिनेश गोर यांना विजयी करण्याकरिता शिवसेनेबरोबर एमआयएम पक्षाची मते घ्यावी लागली. गुजराती समाजाला आपलेसे करण्यासाठी आणि युतीचा धर्म पाळण्यासाठी शिवसेनेने स्वत:हून एक पाऊल पुढे टाकत भाजपाच्या गुजराती समाजाच्या सदस्याच्या पारड्यात महापौरांचे निर्णायक मत टाकले. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपाला खिंडीत पकडण्याची कोणतीही संधी सोडत नसतांना पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे मात्र हातात हात घालून महापालिकेचे राजकारण करीत आहेत.

भाजपाच्या मंडळींनी आपल्या दोन उमेदवारांना अतिरिक्त मते वाटल्याने तिसरा उमेदवार धापा टाकत ९६ मतांवर अडकला. मनसेच्या उमेदवारालाही तेवढीच मते पडली. हातातोंडाशी आलेला घास शिवसेनेने टाळी दिली तर पोटात जाणार होता. मात्र सेनेनी भाजपासोबत युतीची पोळी पिकवल्याने मनसेचा उमेदवार पराभूत झाला. भाजपाच्या दिनेश गौर आणि मनसेचे मिलिंद म्हात्रे या दोघांना प्रत्येकी ९६ मते पडल्याने शिवसेनेच्या महापौर विनीता राणे यांची खरी कसोटी होती. त्यांनी (अर्थातच ‘पती विश्वनाथ राणे’ आणि ‘पक्षश्रेष्ठीं’च्या आदेशांनुसार) युतीधर्म पाळत भाजपाच्या पारड्यात निर्णायक मत टाकले.

पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेचे महापालिकेत ५५ सदस्य आहेत. त्यामुळे परिवहन समितीवर त्यांचे तीन सदस्य सहज निवडून जाणारच होते आणि ते गेलेही. भाजपाचे संख्याबळ ४७ असतांनाही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आग्रहाखातर तीन सदस्य रिंगणात उतरवले. राज्यमंत्र्यांनी गौर हा गुजराती समाजाचा आपला अत्यंत विश्वासू कार्यकर्ता तिसरा उमेदवार म्हणून दिला होता. यामुळे या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून चुरस निर्माण झाली होती.लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने आणि युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याने निवडणुकीचा निकाल अपेक्षित असाच लागला. शिवसेनेने भाजपाला साथ दिली. मराठमोळ््या डोंबिवलीमध्ये जैन, गुजराती समाजाचे प्राबल्य वाढलेले आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी नमो रमो दांडिया, रासरंग भरवून हे समाज जोडून ठेवले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा निवडणूक लढवतील हे बहुतांश नक्की आहे. त्यामुळे युती झाली तर त्यांना भाजपाची व भाजपाशी जोडलेल्या वेगवेगळ््या जाती-धर्मांच्या समूहाची साथ लागणार हे उघड आहे. त्यामुळे शिंदे-चव्हाण यांनी युतीचा धर्म पाळला हे उघड आहे.परिवहनसाठी ‘कधीपण, काहीपण’ करण्याची मानसिकता असलेल्या नेत्यांना काहीही पावले उचलू नका, असे भविष्यवेधी संकेत शिंदे यांनी दिले होते. शिंदे हे मुरब्बी आणि चाणाक्ष राजकारणी असल्याची अनुभूती पुन्हा पदाधिकाºयांना आली. राज्यमंत्री चव्हाण हेही निवडणुकीच्या राजकारणात गिरीश महाजन यांच्या पावलावर पाऊल टाकून सत्ता हस्तगत करु शकतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.भाजपामधील अंतर्गत कुरबुरींनाही निकालाने लगाम लागण्याची शक्यता आहे. पांढरा हत्ती असलेल्या परिवहन निवडणुकीला अचानक महत्त्व आले होते. भाजपामध्ये लाखोंची बोली लागल्याचे आरोप झाले होते. थेट सत्ताधारी पक्षांच्या पक्षश्रेष्ठींवर २५ लाख रुपये घेतल्याचे आरोप झाले होते. आता निकालानंतर सत्ताधारी पक्ष काय कारवाई करतो? याकडे साºयांचे लक्ष आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने पक्ष बोटचेपी भूमिका घेणार का, हाही प्रश्न आहे. शिवसेनेमध्येही लोकशाहीमुळे अंतर्गत नाराजी झाली, आरोप प्रत्यारोप झाले. आता शिवसेना बंडोबांवर काय कारवाई करणार, हा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांचे सत्तेमुळे काँग्रेसीकरण झाले असून आता लोक नेतृत्वाविरुद्ध उघडपणे बोलायला घाबरत नाहीत, हे पुन्हा दिसून आले आहे.

पुढील निवडणुकांपूर्वी पक्षांतर्गत मतभेद, नाराजी दूर करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा ही नाराजी डोकेदुखी वाढवू शकते. राजकारणात वेगवेगळ््या लोकांना पदांची गाजरे दाखवण्यामुळे भाजपा असो की शिवसेना या दोन्ही पक्षात नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही पक्षांचे नेते नाराजांना काय ‘चॉकलेट’ देतात हे बघणे औत्सुक्याचे आहे.मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी साथ दिली. येत्या निवडणुकीत युती विरोधात अन्य पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यामध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेलाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. त्याचा छोटा प्रयोग परिवहनच्या निवडणुकीत केला गेला. राजकीयदृष्ट्या अडचणीत असलेल्या मनसेकरिता हा प्रयत्न दिलासादायक ठरणार आहे.भाजपा, शिवसेना आणि एमआयएम यांचे नाते हे साप-मुंगुसाचे असल्याचे आपण पाहतो. राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकारणात हे पक्ष एकमेकांवर हल्ले करीत असले तरी हिंदुत्वाचे राजकारण करणारे हे दोन पक्ष आणि कट्टरतावादी मुस्लिम राजकारण करणारा एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हेही परिवहन निवडणुकीत दिसले. एमआयएमने भाजपाला १२ मते दिली. भाजपा फोफावली तरच एमआयएम फोफावते हाच विचार या सलगीमागे असू शकतो. सध्या खूप प्रयत्न करुनही एमआयएम निवडणुकीत मुस्लिम मतदारांना आकर्षित करु शकत नाही. चेतवू शकत नाही. त्यामुळे परस्परपूरक राजकारणाचे हे संकेत आहेत.कल्याण-डोंबिवली परिवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला साथ दिली आणि भविष्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत होणाºया युतीचे संकेत दिले आहेत. भाजपाने आपल्या दोन उमेदवारांना अतिरिक्त मते दिल्याने तिसरा उमेदवार आणि मनसेचा उमेदवार यांच्यात काँटे की टक्कर होती. मात्र, शिवसेना आणि एमआयएम यांनी भाजपाची साथ दिली.च्नव्याने निवडून गेलेल्या परिवहन सदस्यांनी केवळ जिंकल्याचे समाधान न मानता, परिवहनची डबघाईला आलेली परिस्थिती सुधारण्यावर भर दिला पाहिजे.च्प्रतिदिन ७ लाखांची असलेली उलाढाल कशी वाढेल, याकडे लक्ष द्यावे. परिवहन म्हणजे घोटाळ््यांची खाण हा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.च्उत्तमोत्तम सेवा-सुविधा, देऊन कल्याण डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर करणे अपेक्षित आहे. इंधन चोरी, इंजिन, तिकीट घोटाळ््यांची पुनरावृत्ती करू नये.च्प्रामाणिकपणे पारदर्शी कारभार करण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचितांसमोर आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना