शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने जीवघेणा हल्ला

By जितेंद्र कालेकर | Updated: August 25, 2021 22:41 IST

श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून अनिस सय्यद याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्ला करणाºया अनिस याच्यावरही जमावाने दगडाने हल्ला केला असून तोही यात गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे प्रकृती गंभीरहल्ला करणाऱ्यावरही झाला दगडाने हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून अनिस सय्यद याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्ला करणाºया अनिस याच्यावरही जमावाने दगडाने हल्ला केला असून तोही यात गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.बाजारपेठेतील एका गाळयाच्या समोरील जागेवरुन अमित जयस्वाल आणि उस्मान सय्यद यांच्यात तीन ते चार महिन्यांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून उस्मानला अमित जयस्वालच्या मुलाने मारहाण केली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. याच पूर्ववैमनस्यातून बुधवारी रात्री श्रीरंग सोसायटीतील शिवसेना शाखेजवळ हा वाद पुन्हा उफाळून आला. उस्मानचा मुलगा अनिस (३०) हा अमित यांना मारहाण करण्यास गेला. त्याचवेळी अमित यांच्यावर त्याने चाकूने तीन वार केले. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्ल्यासाठी आलेल्या अनिस याच्यावरही एका गटाने दगडाने हल्ला केला. हा दगड त्याच्या डोक्याला लागल्याने तो यात गंभीर जखमी झाला आहे. त्यालाही उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राबोडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी