शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवकाची पत्नीला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:55 IST

शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे या पतीने आपल्या गळ्यावर सुरी ठेवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केस ओढून भिंतीवर डोकेही आपटले. मिळेल त्या काचेच्या भांड्यानेही डोक्यात प्रहार केला.

ठाणे : शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे या पतीने आपल्या गळ्यावर सुरी ठेवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केस ओढून भिंतीवर डोकेही आपटले. मिळेल त्या काचेच्या भांड्यानेही डोक्यात प्रहार केला. अमानुषपणे मारहाण होत असताना मध्यस्थी करणाºया सासूलाही त्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कॅरलीन कांबळे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.कॅरलीन यांनी या संदर्भात कळवा पोलिसांकडेही २८ जानेवारी २०१८ रोजी तक्रार दाखल केली. कॅरलीन यांना पहिल्या पतीपासून सनी (१५) आणि जिशॅन (१५) ही दोन तसेच एक दत्तक मुलगा होता आणि गणेश यांच्याशी प्रेमविवाह झाल्यानंतर दोन अशी पाच मुले आहेत. गणेश यांना त्यांचे वडील मल्लिकार्जून यांनी त्यांच्या दुसºया पत्नीमुळे गणेशसह त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढले होते. त्यावेळी गणेश यांना कॅरलीन यांनी भावनिक आणि आर्थिक आधार दिला. ९ जून २०१३ रोजी त्यांनी गणेश यांच्याबरोबर मंदिरामध्ये विवाह केला. दरम्यान, एका मारहाण प्रकरणात गणेश यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लागला. यात गणेश आणि त्यांच्या वडिलांनाही अटक झाली होती. या प्रकरणात जामीनासाठीही पत्नी या नात्याने मदत केल्यामुळे सहा महिन्यातच त्यांची जामीनावर सुटकाही झाली. कॅरलीन गरोदर असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीनही लवकर मिळाला होता. हे सर्व असताना नशेच्या आहारी गेलेल्या गणेश यांनी त्यांना अनेकदा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून डोकेही आपटले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकीही दिली, असे कॅरलीनने तक्रारीत म्हटले आहे.आधी पत्नी म्हणून नाकारणाºया गणेश यांनी नंतर पोलीस ठाण्यातच माफीही मागितली होती; परंतु, २६ जानेवारी रोजीही त्यांनी मारहाण केल्यामुळे याबाबतची तक्रार २८ जानेवारी रोजी कळवा पोलीस ठाण्यात केली.>मुलांसमोरही शारीरिक, मानसिक छळगणेश यांच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीसारखे गुन्हे दाखल आहेत. कॅरलीन यांच्याही तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध तडीपारीचाही प्रस्ताव ठेवलेला आहे. ४९८ ची तक्रार दाखल करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. म्हणून कॅरलीन यांच्याकडे लग्नपत्रिकेसह कागदपत्रे मागितली होती.- शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे