शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

आरक्षण सोडतीत शिवसेना-भाजपामध्ये जल्लोष

By admin | Updated: December 23, 2016 03:00 IST

भिवंडी महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रथमच चारसदस्यीय प्रभागरचना निर्माण केली असून

वज्रेश्वरी : भिवंडी महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रथमच चारसदस्यीय प्रभागरचना निर्माण केली असून २०११ ची जनगणना प्रमाण मानून ९० सदस्य संख्या असलेल्या महानगरपालिकेतील आरक्षित प्रभागांची सोडत गुरुवारी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. मीनाताई रंगायतन येथे गोंधळाच्या परिस्थितीत पार पडली. या आरक्षणात विद्यमान महापौर तुषार चौधरी, उपमहापौर अहमद सिद्दीकी, माजी महापौर विलास पाटील, प्रतिभा पाटील, जावेद दळवी यांचे प्रभाग सुरक्षित झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. आरक्षणामुळे शिवसेना-भाजपाला जास्त फायदा होणार असल्याने त्यांनी जल्लोष केला, तर समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्ते व नेत्यांमध्ये नाराजी दिसत होती. एकूण जागा ९०, त्यापैकी महिलांकरिता ५० टक्के राखीव जागा आहेत.पालिकेच्या २३ प्रभागांसाठी ९० वॉर्डांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. २०११ च्या जणगणनेनुसार भिवंडी महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या ७,०९,६५५ असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या २१८२०, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ८१८७ असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांकाप्रमाणे ४ सदस्य असलेले २१, तर ३ सदस्य असलेले २ प्रभाग असे एकूण २३ प्रभाग तयार केले आहेत. या निवडणुकीत अनुसूचित जातींकरिता तीन जागा राखीव झाल्या असून त्यापैकी दोन महिलांसाठी आहेत. तर, अनुसूचित जमातीकरिता एक जागा महिलांकरिता राखीव असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. प्रभाग क्र मांक १७, २०, २१ हे अनुसूचित जातींकरिता, तर प्रभाग क्र मांक १३ हा अनुसूचित जमातींकरिता राखीव ठेवला असून प्रभाग क्र मांक १५ व २२ हे त्रिसदस्यीय प्रभाग असेल. २६ डिसेंबरला प्रभागाच्या प्रारूप सीमा जाहीर केल्या जाणार असून त्यास हरकती घेण्याकरिता दिनांक ९ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. या आरक्षण सोडतीस महानगरपालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यासोबतच उपायुक्त मुख्यालय विनोद शिंगटे, उपायुक्त दीपक कुरळेकर, अनिल डोंगरे, नगररचनाकार आर.एस. राठोड, करमूल्यांकन अधिकारी वंदना गुळवे, आजीमाजी नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)