शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात शिवसेना, भाजपाचे आंदोलन !

By सुरेश लोखंडे | Updated: March 25, 2023 17:33 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे.

ठाणे :  काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. ओबीसी समाजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली ठाण्यात त्यांच्या निषेधार्थ भाजपा व शिवसेने वेगवेगळे आंदोलन आज छेडले. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

कोर्ट नाका येथे झालेल्या आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजही सहभागी झाला होता. या आंदोलनात राहुल गांधी यांचा भाजपाने तीव्र शब्दांत धिक्कार केला. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, संजय वाघुले आदीसह संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. गांधी यांनी 'मोदी'आडनावावरून अपमानास्पद वक्तव्य केले. त्यातून ओबीसी व समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला.  भाजपा पाठोपाठ राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला, त्यांच्या या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील आनंद आश्रम येथून ठाणे काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच हा मोर्चा मध्येच अडवला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली.