शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विजयाच्या जल्लोषात शिवसेना-भाजपा वरचढ

By admin | Updated: February 24, 2017 07:28 IST

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला.

पंकज पाटील /उल्हासनगरउल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. तर, शिवसेनेनेदेखील गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकून आपले वर्चस्व निर्माण केले. निवडणुकीचा पहिला कल हा पॅनल क्रमांक १७ मधून आला. या पॅनलमध्ये सर्व चारही जागा राष्ट्रवादीने जिंकल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र, जसजसे निकाल बाहेर पडू लागले, तसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मर्यादित राहिले आणि मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांचीच गर्दी एकवटण्यास सुरुवात झाली. शिवसेनेसोबत भाजपाच्या विजयाचे निकाल लागत असल्याने दोन्ही पक्षांच्याच कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी दिसत होती. विजयी उमेदवारांच्या नावांचा जयघोष सर्वत्र घुमत होता. मतमोजणी कें द्राच्या बाहेर दोन्ही बाजूंना कार्यकर्त्यांची गर्दी झालेली होती. वाढती गर्दी पाहून पोलीसदेखील ती आवरण्याचा प्रयत्न करत होते. मतदान केंद्राप्रमाणेच शहरात पक्ष कार्यालयातदेखील कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. उमेदवारांचे कार्यालयही कार्यकर्त्यांनी भरलेले होते. भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कार्यालयात बसून निवडणुकीच्या निकालावर लक्ष ठेवण्यात येत होते. जसजसे निकाल पुढे येत होते, त्याप्रमाणे भाजपा कार्यालयात जल्लोष सुरू होता. मात्र, शिवसेनेच्या बाबतीत शहरातील शाखांमध्येच कार्यकर्ते बसून निकालाचा कल जाणून घेत होते. उल्हासनगरच्या निकालाची प्र्रतीक्षा सर्वांनाच असली, तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे खरे लक्ष उल्हासनगरपेक्षा मुंबई-ठाण्यावर जास्त होते. ज्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात होता, ते उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीच्या ठिकाणी गेले होते. शिवसेना आणि भाजपाच्या पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी होती तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या कार्यालयांबाहेर शुकशुकाट पसरलेला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्या खाजगी कार्यालयात बसून इतर निकालांचा वेध घेण्याचे काम करीत होते. साई पक्षाच्या कार्यालयात सुरुवातीला नाराजीचे वातावरण होते. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांच्या बाजूने एकही निकाल न आल्याने साई पक्ष मागे पडला की काय, अशी भीती होती. मात्र, निकालाच्या शेवटच्या सत्रात साई पक्षाच्या बाजूने चांगला निकाल लागल्याने साई पक्षाचा शेवट गोड झाला. अपेक्षित यश आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहील, एवढा आकडा गाठल्याने साई पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष भगवान भालेराव यांना ओमी कलानी यांनी पाडण्याचा प्रयत्न केला, तरीही ते निवडून आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रिपाइंच्या बाबतीत कहीं खुशी कहीं कम, अशी स्थिती निर्माण झाली होती. कुठे आसू तर कुठे हासूसत्तेची गणिते काहीही असली तरी विजयी उमेदवारांनी आनंद अत्यंत जल्लोषात साजरा केला. उमेदवार जरी मतमोजणी केंद्रात असले तरी बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. या जल्लोषात शिवसेना आणि भाजपा या दोन्हीच पक्षांचे झेंडे दिसत होते. तर, इतर पक्षांचे झेंडे मतमोजणी केंद्रापासून दूर राहिले. मतदान केंद्राप्रमाणेच शहरात पक्ष कार्यालयातदेखील कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. उमेदवारांचे कार्यालयही कार्यकर्त्यांनी भरलेले होते. शिवसेना आणि भाजपाच्या पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी होती तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या कार्यालयांबाहेर शुकशुकाट पसरलेला होता.