शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी साजरा केला स्वाभिमान दिवस, ठाकरे गटाला प्रत्युत्तर

By अजित मांडके | Updated: June 20, 2023 20:12 IST

ठाण्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी स्वाभिमान दिवस साजरा करत ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

ठाणे: ठाण्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी स्वाभिमान दिवस साजरा करत ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील वर्षी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह सुरतेला रवाना झाले आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले होते. यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कडून गद्दार दिवस साजरा करण्यात येत आहे. त्याला स्वाभिमान दिन साजरा करून शिंदे समर्थकाकडून उत्तर देण्यात आले.

एका वर्षांपूर्वी २० जून २०२२ ला रात्री आपल्या समर्थक ४० आमदारांसह एकनाथ शिंदे सुरतला रवाना झाले होते.  त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबल उडाली होती. त्यानंतर  सत्तांतर होऊन राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील  महाविकास आघाडीचे सरकार गेले होते. याचाच निषेध म्हणून मंगळवारी राज्यभर उद्धव बाळासाहेब  ठाकरे यांचा शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गद्दार दिवस साजरा करण्यात आला. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या किसन नगर येथील शिवसेना शाखेसमोर जमत शिवसैनिकांनी स्वाभिमान दिवस साजरा केला. यावेळी फटाके फोडत  लाडू वाटून आणि केक कापून आपला आनंदही व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे आणि  धाकटे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे उपस्थित होते. यावेळी संभाजी शिंदे यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे