शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे सावट असतानाही ठाण्यात शिवजयंती उत्साहात; चित्ररथ ठरले आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 00:46 IST

ठाणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग, शिवचरित्रावर आधारित देखावे सादर

ठाणे : सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचे सावट असतानाही ठाणे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार येणारा शिवजयंती उत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात, बॅण्ड पथकांचे सुरेल सूर, आकर्षक चित्ररथ, शिवचरित्रावर आधारित जिवंत देखावे आणि ढोल-ताशांच्या गजरात हा उत्सव साजरा झाला.

सध्या कोरोनाचे सावट असल्याने गर्दी टाळावी, मिरवणुका काढू नयेत, तसेच इतर काळजीही घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग आणि पोलिसांमार्फतही केले आहे. त्यामुळे याचा परिणाम शिवजयंती उत्सवावर होईल, असे प्रारंभी वाटत होतो. परंतु असे असताना ठाण्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाची सुरु वात गुरुवारी सकाळी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक नरेश मणेरा, उपायुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकही या उत्सवात सहभागी झाले होते.पालकमंत्र्यांकडून अभिवादनराज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आमदार, खासदार, नगरसेवकांच्या उपस्थितीत मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर पालखीमधील शिवप्रतिमेचे विधिवत पूजन केल्यानंतर भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, बॅण्ड पथके, दांडपट्टा फिरवणारे साहसी तरुण, आकर्षक चित्ररथ अशा विविधरंगी मिरवणुकीने ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीवर कोरोनाचे सावट आहे, असे कुठेही दिसून आले नाही.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती